शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेच्या कारभारावर मुंबईत ११ ला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:22 IST

आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे.

अकोला: मनपा प्रशासनाला ४० ते ५० कोटींचा चुना लावणाऱ्या मोबाइल कंपन्या असोत वा निकृष्ट सिमेंट रस्ते, शौचालय बांधकामात लाटलेली कोट्यवधींची देयके तसेच आउटसोर्सिंगद्वारे कागदोपत्री खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासह विविध विषयांवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे.गत काही दिवसांपासून पारदर्शी व स्वच्छ कारभाराचा दावा करणाºया सत्ताधारी भाजपच्या कालावधीत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आल्यानंतरही संबंधितांची पाठराखण केल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जात आहे. या पृष्ठभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.‘अमृत’च्या कामात घोळकेंद्र शासनाच्या ‘अमृत अभियान’ अंतर्गत सुमारे ७० कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजना आणि ११० कोटी रुपयांतून पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि देयक अदा करणाºया मनपा प्रशासनाला बोटाच्या तालावर नाचवून दोन्ही योजनांची कामे सर्व निकष-नियम धाब्यावर बसवून पूर्ण केली जात आहेत. याविषयी विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंने चुप्पी साधणे पसंत केले आहे, हे येथे उल्लेखनीय.ठोस निर्णय होईल का?मनपाच्या अनागोंदी कारभारावर मुंबईत पार पडणाºया बैठकीत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी सामील होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत ठोस निर्णय होईल की केवळ स्वत:चे इप्सित साध्य करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जाईल, हे लवकरच समोर येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका