शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी मुंबईत बोलाविली बैठक

By admin | Updated: July 7, 2015 01:43 IST

महापौर-उपमहापौर, आयुक्त राहणार उपस्थित.

अकोला: शहर विकासाच्या रखडलेल्या मुद्यांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या दालनात मंगळवारी महापौर, उपमहापौर तसेच आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला मजीप्रासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. सद्यस्थितीत संपूर्ण जिल्हा भाजपच्या ताब्यात आहे. योगायोगाने राज्याचे नगर विकास राज्यमंत्री तसेच पालकमंत्रीसुद्धा अकोल्याचे रहिवासी आहेत. मनपातील भ्रष्ट कारभार व अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होत असताना अशा अधिकार्‍यांची उचलबांगडी करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. साहजिकच, त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. शहर विकासाचे अनेक विषय शासन दरबारी प्रलंबित आहेत. यामध्ये भूमिगत गटार योजनेच्या तांत्रिक मंजुरीचा प्रस्ताव, स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल), शहरातील पाइपलाइन बदलणे आदींचा समावेश आहे. संबंधित विषयावर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. याकरिता महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, आयुक्त सोमनाथ शेटे सोमवारी मुंबईकडे रवाना झाले.