शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

वैद्यकीय प्रतिनिधींचा संप !

By admin | Updated: February 4, 2017 02:36 IST

केंद्रीय संघटनेच्या आवाहनास प्रतिसाद ; ७00 ‘एमआर’चा सहभाग.

अकोला, दि. 0३-आपल्या विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधींच्या (एमआर) अखिल भारतीय संघटना ह्यफेडरेशन ऑफ मेडिकल अँन्ड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनह्ण (एफएमआरएआय)ने पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या हाकेला ओ देताना महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना (एमएसएमआरए), अकोलाच्या सदस्यांनी शुक्रवारी एकदिवसीय संप पाळला, तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांमार्फत पंतप्रधान व कामगार मंत्री यांना पाठविले.केंद्र व राज्य सरकार वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असलेल्या कामगार कायद्याच्या अंमलबजावणीस टाळाटाळ करीत आहे. अनेक वर्षांंच्या प्रयत्नानंतर वैद्यकीय प्रतिनिधींसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय त्रिपक्षीय समितीची बैठक केंद्रीय कामगार मंत्र्यांनी अनेकदा आश्‍वासने देऊनही बोलावली नाही. औषध कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून वैद्यकीय प्रतिनिधींवर अन्याय होत आहे. त्यांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकणे, वेतन थांबविणे, विक्रीसाठी दबाव आणणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक वैद्यकीय प्रतिनिधींनी आत्महत्या केल्या आहेत, तसेच इलेक्ट्रॉनिक रिपोर्टिंग सीस्टिमच्या नावाखाली औषध कंपन्या वैद्यकीय प्रतिनिधींचे पगार भत्ते कापत आहेत. वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असलेल्या सेल्स प्रमोशन एम्प्लॉइज अँक्ट १९७६ अंतर्गत फार्म ह्यएह्णमध्ये नियुक्ती पत्र मिळणे, त्यांच्या कामाचे स्वरूप ठरविणे यांची अंमलबजावणी न करता केंद्र व राज्य सरकार मालक धाजिर्णी भूमिका घेत असल्याचा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. केंद्र सरकारने औषधांवर जीएसटी लावू नये, औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंद घालावी, या व इतर मागण्यांसाठी देशभरातील शेकडो वैद्यकीय प्रतिनिधींनी दिल्ली येथील जंतरमंतर येथे २१ नोव्हेंबर २0१६ रोजी धरणे दिले. त्यानंतरही सरकारने दखल न घेतल्यामुळे ३ फेब्रुवारी २0१७ रोजी देशभरातील तब्बल दोन लाख वैद्यकीय प्रतिनिधींनी एकदिवसीय संप पाळला. यामध्ये अकोला जिल्हय़ातील ७00 वैद्यकीय प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून सचिव निखिल हागे यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे सोपविले.