शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या कामगिरीचे होणार पोस्टमॉर्टेम!

By admin | Updated: June 6, 2015 01:48 IST

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कर्मचा-यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याचे दिले आदेश.

अकोला : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये रिक्त पदे, यंत्रसामग्रीची कमतरता, निधीची गरज, पीजीचा मुद्दा आदी विषयांना बाजूला सारून कर्मचारी, अधिकार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन करा. त्यानंतरच कुठे कोणत्या बाबींची गरज आहे हे आपण पाहू, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना ठणकावले आणि आधी मेडिकलच्या कामगिरीचे पोस्टमॉर्टेम करा, असे आदेश त्यांनी दिले. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली व प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते व विविध विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली. यावेळी जिलचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, भाजपचे विभाग संघटनमंत्री डॉ. रामदास आंबटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील, किशोर मांगटे पाटील, दीपक मायी उपस्थित होते. प्रभारी अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयासंबधी अडचणी विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या; परंतु तावडे यांनी त्यांच्या मुद्दय़ाला बाजूला सारून महाविद्यालय आणि रुग्णालय या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि रुग्णसेवेबाबत नेहमी चर्चा होते; परंतु या दोन्हींना महत्त्व दिले गेले पाहिजे. महाविद्यालय व रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. मनुष्यबळ नसल्याने कामे होत नाहीत. हे बाजूला ठेवा आणि येथील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी काय काम करतो, याचे आधी मूल्यमापन करा. मूल्यमापन केल्यानंतरच कर्मचारी, अधिकारी, परिचारिकांची पदे भरणे आवश्यक आहेत का, याचा विचार होईल. असे सांगत तावडे यांनी येथील कामाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले.

*वैद्यकीय शिक्षणाचे बजेट ३४0 कोटींचे

  वैद्यकीय शिक्षणासाठीचे बजेट केवळ ३४0 कोटी रुपयांचे असल्यामुळे प्रत्येक महाविद्यालयातील जागा भरणे, निधी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने स्थानिक निधीचा वापर करावा; मात्र अत्यावश्यक गरजांना प्राधान्य दिले जाईल. कामाचे नियोजन करून आणि वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये समन्वय राखूनच आपल्याला सुधारणा करावी लागणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.