शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांना शिवीगाळ!

By admin | Updated: May 28, 2017 03:48 IST

समाधान शिबिरात तक्रार; आठवडी सभेत दारू पिऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : कर्तव्यावर असणार्या कर्मचार्यांना आठवडी सभेत दारू पिऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणार्या दानापूरच्या वैद्यकीय अधिकार्यांची तक्रार आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांनी तालुका आरोग्य अधिकार्यांकडे केली होती; मात्र त्यावर कुठलीही करवाई करण्यात आली नसल्याने त्रस्त कर्मचार्यांनी २८ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या राजस्व समाधान शिबिरात तक्रार केली आहे. दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वेते यांनी ३१ मार्च २0१७ ला सकाळी आठवडी सभा बोलविली; परंतु स्वत: सायंकाळी ५ वाजता मद्य प्राशन करून सभेत आले. सभेत कर्मचार्यांसोबत वाद घालून शिवीगाळ केली. एन. एम. इंगळे यांच्या अंगावर धावून दात पाडण्याची धमकी दिली. त्यानंतर नवलकार, शामस्कर, चापके, तारमेकवार, दहीकर आदी कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचार्यांनासुद्धा काहीही कारण नसताना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केली. तुमच्या वेतनवाढ रोखून इन्क्रीमेंट बाद करण्याची, बडतर्फ करण्याची, सी.आर. खराब करण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार कर्मचारी एन. एम. इंगळे, आर. ई. अलटकार, पी. बी. चापके, ए. बी. तारमेकवार, एम. जे. राऊत, व्ही. एम. कांबळे, एम. व्ही. नवलकार, सुशिला मनीष गावंडे, डी. बी. बरींगे, व्ही. एस. कवळकार, डी. डब्ल्यू मेटांगे, पी. के. दहीकर आदींनी ६ एप्रिल रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली होती. दोन महिन्यांनंतरही कारवाई न झाल्याने सदर कर्मचार्यांनी अखेर राजस्व समाधान शिबिरात दाद मागितली आहे.