शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजना कागदावर; ग्रामस्थ ‘झ-या’वर!

By admin | Updated: April 30, 2016 01:40 IST

अकोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई : तहान भागविण्यासाठी पायपीट.

अकोला: तळपत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील अकोला तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. खारपाणपट्टा असल्याने पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नाही, नळांना २५ ते २७ दिवस पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी तालुक्यात विविध उपाययोजना मंजूर असल्या, तरी प्रत्यक्षात उपाययोजनांची केवळ १७ कामे पूर्ण झाली आहेत. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना कागदावरच असल्याने टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना आटलेल्या नदी-नाल्यांमधील ह्यझर्‍यांह्णच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे सर्वाधिक चटके खारपाणपट्ट्यातील अकोला तालुक्यातील ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. जिल्हय़ात सर्वात मोठय़ा असलेल्या अकोला तालुक्यात १९९ गावांचा समावेश असून, खारपाणपट्टा असल्याने नळ पाणीपुरवठा योजनांद्वारे गावांना पाणीपुरठा केला जातो. परंतु, आटलेले नदी-नाले आणि धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने, गावांमधील नळांचे पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून गत सप्टेंबरपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने महान धरणातील पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून ६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र या योजनेची जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने पाणीपुरवठा करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.