शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून माझोड-गोरेगाव-अकोला रस्ता बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:19 IST

माझोड: जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अकोला-हिंगणा फाटा-गोरेगाव-माझोड रस्ता गेल्या आठ दिवसांपासून बंद ...

माझोड: जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अकोला-हिंगणा फाटा-गोरेगाव-माझोड रस्ता गेल्या आठ दिवसांपासून बंद पडल्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून केवळ दुचाकीचाच प्रवास सुरू आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

माझोड-अकोला हा पालखी मार्ग म्हणून मंजूर झाला होता. त्यानंतर सरकार बदलले मात्र रस्त्याची दुर्दशा जैसे थे आहे. तसेच या रस्त्यासाठी आंदोलने झाली, संबंधित विभागाला निवेदन देऊन दुरुस्तीची मागणीही करण्यात आली. मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने ते केवळ दिखाव्यापुरतेच ठरले आहे. गत आठवड्यात झालेल्या मुसळ‌धार पावसामुळे रस्त्यावरील पुलांच्या बाजूस पर्यायी रस्ते खचले आहेत. तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. गोरेगाव येथील नागरिक कापशीमार्गे तर कळंबेश्वर येथीन नागरिक लोणीमार्गे अकोल्याला जात आहेत. संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)

----------------

रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्या बंद आहेत. सद्यस्थितीत शाळा सुरू झाल्या असून, रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना जाता येत नसल्याने नुकसान होत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.

-जयश्री शेगावकर, सरपंच, गोरेगाव बु.

----------------------------

‘मते मागण्यासाठीच गावात या फक्त!’

माझोड-गोरेगाव-अकोला रस्त्याची दयनीय अ‌वस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी ‘मते मागण्यापुरतेच गावात या फक्त!’ असे मोठ्या अक्षरात कळंबेश्वरनजीकच्या नालीवर लिहून लोकप्रतिनिधींविषयी संताप व्यक्त केला आहे.

------------------------

गोरेगावमार्गे बंद पडल्याने अकोल्याला जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांसाठी अकोला शहर हे मुख्य बाजारपेठ तसेच सर्व शासकीय कार्यालय अकोल्यात आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

-दिनकर खंडारे, वंचित बहुजन आघाडी, माझोड.

--------------

270721\4920img-20210726-wa0159.jpg

फोटो