शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी

By admin | Updated: February 4, 2017 02:33 IST

इच्छुकांमध्ये होणार घमासान; सर्वांंनाच अकोला महापौर पदाची समान संधी

अकोला, दि. 0३- महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली असता, यंदा प्रथमच अकोल्याचे महापौरपद खुला सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले आहे. त्यामुळे साहजिकच महापालिकेच्या राजकारणात दबदबा कायम ठेवणार्‍या दिग्गजांमध्ये घमासान रंगण्याची चिन्हं आहेत. महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामात सर्वच राजकीय पक्ष, स्थापन झालेल्या आघाड्या व अपक्ष उमेदवार विजयी होण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. सद्यस्थितीत मनपात भाजप-शिवसेना युतीची सत्ता असली तरी यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढणे पसंत केले. हाच कित्ता काँग्रेस-राष्ट्रवादीने गिरवत परस्परांविरोधात दंड थोपटले आहेत. मनपात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्ष व्यूहरचना आखत असतानाच ३ फे ब्रुवारी रोजी मुंबईत महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महापौरपदाचे आरक्षण लक्षात घेता, यावेळी अनुसूचित जाती पुरुष किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची अपेक्षा होती. यंदा अकोल्याचे महापौरपद खुला सर्वसाधारण प्रवर्ग निघाले आहे. त्यामुळे सर्वच प्रवर्गातील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, हे तेवढेच खरे. महिलांचीही दावेदारी कायम राज्यातील २७ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली असता, यापैकी १४ ठिकाणचे महापौरपद महिलांसाठी राखीव निघाले आहे. निवडणुकीत ८0 जागांपैकी ४0 जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिला नगरसेविकांनी ४0 चा आकडा ओलांडल्यास यंदादेखील महिलांना महापौरपदाची सुवर्णसंधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेने राजकीय पक्षांकडून चाचपणी केली जात आहे.