शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत गणित, बुद्धिमत्तेचा वरचष्मा!

By admin | Updated: September 14, 2016 00:30 IST

शिष्यवृत्ती परीक्षा आता नव्या स्वरूपात होणार असून तीन पेपरऐवजी होणार दोनच पेपर.

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. १३ : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च २0१६-१७ मध्ये इयत्ता चौथी व सातवी ऐवजी इयत्ता पाचवी व आठवीमध्ये घेण्यात येणार आहे. सोबतच या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूपदेखील बदलण्यात आले असून, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता विषयांवर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे नवीन स्वरूपातील या शिष्यवृत्ती परीक्षेत गणित व बुद्धिमत्ता या विषयांचा वरचष्मा राहणार आहे. इयत्ता चौथी व सातवीसाठी आतापर्यंत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती; मात्र २0१६-१७ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. २0१६-१७ या वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलून इयत्ता चौथीच्या ऐवजी पाचवी व सातवीच्या ऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच तीन पेपरऐवजी दोनच पेपर ठेवण्यात आले आहेत. या नव्या स्वरूपाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी गुण वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी ७0 गुण ठेवण्यात आले होते; परंतु आता नव्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी १00 गुण ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे ३00 गुणांसाठी तीन पेपर घेण्यात येत होते. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी भाषा व ३0 गुणांसाठी इंग्रजी विषय होता. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेत ७0 गुणांसाठी गणित व ३0 गुणांसाठी परिसर अभ्यास या विषयांचा समावेश होता, तर तिसर्‍या प्रश्नपत्रिकेत ७0 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी व ३0 गुणांसाठी उर्वरित परिसर अभ्यास या विषयांचा समावेश होता. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्या प्रश्नपत्रिके मध्ये ८0 गुणांसाठी भाषा व २0 गुणांसाठी इंग्रजी विषय होता. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी गणित व ३0 गुणांसाठी सामाजिक शास्त्र आणि तिसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी व ३0 गुणांसाठी सामान्य विज्ञान विषयाचा अंतर्भाव होता.असे आहे शिष्यवृत्ती परीक्षेचे नवीन स्वरूप१. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रथम भाषा ५0 गुण व गणित विषयासाठी १00 गुण.२. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये तृतीय भाषा ५0 गुण व बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी १00 गुण.अशी राहिल बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३0 टक्के गुणांचे राहणार असून मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४0 टक्के तर कठीण स्वरूपाचे प्रश्न ३0 टक्के गुणांचे राहणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावात बदलआतापर्यंत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा असे नाव होते; मात्र २0१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला आहे. आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना, या नावाने या परीक्षेस ओळखले जाणार आहे.शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीऐवजी पावचीमध्ये व सातवीऐजवी आठवीमध्ये आयोजित करण्याचे निश्‍चित केल्यानुसार सन २0१६-१७ मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या मराठी माध्यमाकरिता शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त अशी मार्गदर्शिका राज्य परीक्षा परिषदेमार्फत तयार करण्यात आली आहे. रा. वि. गोधने,आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, पुणे.