शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार लेकींकडून माता रमाईंना मानवंदना; अशोक वाटिका येथे रमाई जन्मोत्सव सोहळा  

By रवी दामोदर | Updated: February 7, 2024 19:30 IST

महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

अकोला: अशोक वाटिका प्रेरणाभूमि ट्रस्ट तथा महिला महासंघाच्यावतीने शहरातील अशोक वाटिका परिसरात ‘बहूजनांची आई रमाई जन्मोत्सव सोहळा दि. ७ फेब्रुवारी रोजी थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाभरातील पाच हजार लेकींकडून माता रमाईंना मानवंदना देण्यात आली.

महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. वंचित बहुजन आघडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी नांदेड येथील ॲड. गोविंद दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती, तर भिक्खू सुनीत बोधी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा संगिता अढाऊ, अरुंधती सिरसाट, प्रभाताई सिरसाट, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाअध्यक्ष पी. जे. वानखडे, भाऊसाहेब थोरात, गजानन गवई, जि. प. सदस्य शंकरराव इंगळे, मनोहर बनसोड, पराग गवई,देवानंद पाटील, अनिल पंडीत, कवी देवेंद्र शामस्कर, गजानन सुरवाडे आदी उपस्थित होते. अशोक वाटिका परिसरात जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावत माता रमाईंना अभिवादन केले. कार्यक्रमात चिमुकल्यांसह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम वानखडे, संतोष रायबोले यांनी केले. प्रास्ताविक सुनील गवई, डॉ. ज्ञा. वा. गवई यांनी, तर आभार संगिता रायबोले यांनी मानले. भीम गितांतून केले प्रबोधनअशोक वाटिका परिसरात आयोजित बहुजनांची आई रमाई जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सपनाताई खरात व त्यांच्या संचाकडून भीम गितांचा कार्यक्रम संपन्न झाला. या भीम गितांमधून प्रबोधन करण्यात आले. परिसरात अनेक पुस्तकांचे स्टॉल व विविध साहित्यांचे स्टॉल लागले होते. दिवसभर जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावल्याने अशोक वाटिका परिसर गर्दीने फूलून गेल्याचे पहावयास मिळाले.

टॅग्स :Akolaअकोला