मूर्तिजापूर : तालुक्यातील लाखपुरीजवळील पायटांगी फाट्याजवळ पाऊस येण्यापुर्वी झालेल्या वादळांमुळे निंबाचा एक वृक्ष कोसळल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना १०० वाहने अडकून पडली होती.लोकांनी रस्त्यावर पडलेले झाड उचलून बाजूला केल्यामुळे वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावले असून १६ जूनपासून तालुक्यात पेरण्यांना प्रारंभ होण्याचे संकेत आहेत.
मूर्तिजापुरात मुसळधार पाऊस!
By admin | Updated: June 16, 2017 00:40 IST