शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीखोरांनी कट रचून घडविले हत्याकांड

By admin | Updated: July 2, 2014 00:31 IST

रायली जीन परिसरातील मंगलदास मार्केटमध्ये घडलेले हत्याकांड हे पूर्वनियोजित कट रचून घडविण्यात आले

अकोला : रायली जीन परिसरातील मंगलदास मार्केटमध्ये घडलेले हत्याकांड हे पूर्वनियोजित कट रचून घडविण्यात आले असून, आरोपी हे बाजारपेठमध्ये खंडणी वसूल करतात, असा आरोप हत्याकांडातील साक्षीदार आणि जखमी शेख सलीम शेख बुर्‍हान नौरंगाबादी यांनी मंगळवारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. हे पत्र त्यांनी जिल्हाधिकार्‍यांनाही सादर केले आहे. मंगलदास मार्केटमध्ये २६ जून रोजी घडलेल्या सशस्त्र संघर्षात शेख अक्रम शेख बुर्‍हान नौरंगाबादी यांचा खून करण्यात आला. तसेच शेख सलीम शेख बुर्‍हान नौरंगाबादी, महेबूब खान ऊर्फ मब्बा हे दोघे जखमी झाले. शेख साजिद शेख सुलतान, शेख सुलतान शेख यासीन, शेख रशीद शेख सुलतान, शेख आरीफ शेख आमद, शेख नईम शेख गफूर, शेख रहीम शेख गफूर आणि शेख फरीद पहेलवान यांनी खून केल्याचा आरोप जखमी सलीम यांनी पत्रात केला आहे. हत्याकांडातील आरोपी हे अवैध सावकारीच्या धंद्यात गुंतले असून, त्यांच्या दादागिरीमुळे बाजारपेठेतील व्यापारी त्रस्त झाले आहेत, असा आरोप सलीम यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे आरोपींवर कठोर कावाईची मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. ** आरोपीचे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी प्रयत्नहत्याकांडातील आरोपी तथा माजी नगरसेवक शेख फरीद हा आपल्या सर्मथकांमार्फत घटनेच्या दिवशी आपण रुग्णालयात भरती असल्याचे डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सलीम यांनी पत्रात म्हटले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्याला काही नगरसेवक हे मदत करीत असल्याचेही सलीम यांचा दावा आहे. शेख फरीदची पत्नी शमशाद या मनापा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आल्या आहेत.