शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांचे पार्थिव आज पोहोचणार!

By admin | Updated: January 31, 2017 02:27 IST

अंत्यसंस्काराची तयारी; जिल्हाधिका-यांनी दिली माहिती.

अकोला, दि. ३0- काश्मीरमधील हिमस्खलनात जिल्हय़ातील शहीद दोन जवानांचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंंत अकोल्यात पोहोचण्याची शक्यता असून, दोन्ही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशील नगरमधील जवान आनंद शत्रुघ्न गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील संजय सुरेश खंडारे या दोन जवानांना गत २५ जानेवारी रोजी वीरमरण आले. १३ महार बटालियनचे जिल्हय़ातील दोन जवान शहीद झाल्याने, जिल्हय़ात शोककळा पसरली आहे. दोन्ही शहीद जवानांचे पार्थिव सोमवारी श्रीनगरमध्ये पोहोचले असून, शवविच्छेदन करण्यात आले. श्रीनगर येथून विमानाने शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहेत. दिल्ली येथून विमानाने त्यांचे पार्थिव नागपूर येथे पोहोचणार आहेत व नागपूर येथून शासकीय वाहनाने शहीद जवानांचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंंत अकोल्यात पोहोचणार आहेत. त्यामध्ये संजय खंडारे यांचे पार्थिव माना येथे आणि आनंद गवई यांचे पार्थिव अकोला येथे पोहोचणार आहे. त्यामध्ये संजय खंडारे यांच्या पार्थिवावर माना येथे तर आनंद गवई यांच्या पार्थिवावर अकोल्यातील गीतानगर स्थित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना विश्‍वासात घेऊन अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.