अकोला : माहेरावरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करणार्या सासरच्या नऊ जणांविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुलडाण्यातील वृंदावन नगरात राहणारी डॉ. कल्पना गणेश राठोड हिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा २00६ मध्ये बुलडाणा येथील गणेश प्रल्हाद राठोड यांच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून कल्पना हिला माहेरावरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला जात होता. ही बाब कल्पनाने माहेरच्या मंडळींना सांगितल्यावर माहेरच्या मंडळींनी अडीच लाख रुपये दिले. त्यानंतरही मात्र सासरची मंडळी कल्पनाला पैशांची मागणी करीत होती; परंतु ती पैसे आणत नसल्याने तिचा मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. विवाहितेच्या तक्रारीनुसार पती गणेश प्रल्हाद राठोड, सासरा प्रल्हाद लक्ष्मण राठोड, सासू चं पा राठोड, दीर विकास राठोड, संजय हरिभाऊ राठोड, सविता संजय राठोड, प्रकाश लक्ष्मण राठोड, अशोक दयाराम पवार आणि कल्पना अशोक पवार यांच्यावर भादंवि कलम ४९८ (अ), ५0६ नुसार खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विवाहितेचा छळ, नऊ जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: October 17, 2014 01:20 IST