शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ात ‘मारोडी बंधारा पॅटर्न’ राबविणार!

By admin | Updated: August 21, 2015 01:08 IST

जिल्हाधिका-यांची ग्वाही ; मारोडी येथे बंधा-याचे जलपूजन.

अकोला: खारपाणपट्टय़ातील जिल्हय़ातील मारोडी येथे सिमेंट बंधारा बांधण्याचा नवा प्रयोग यशस्वी झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या पडताळणी करून, शेतकर्‍यांना संरक्षित ओलिताची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात ह्यमारोडी बंधारा पॅटर्नह्ण राबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मारोडी येथे ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्‍यातील जलपूजनप्रसंगी पत्रकारांशी जिल्हाधिकारी बोलत होते. खारपाणपट्टय़ातील मारोडी येथे सिमेंट नाला बंधार्‍याच्या कामातून नवा प्रयोग करण्यात आला आहे. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या या बंधार्‍याच्या क्षेत्रात दोन साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत. मरोडा येथील सिमेंट बंधार्‍यामुळे या भागातील शेतकर्‍यांना संरक्षित ओलिताची सोय सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेतकर्‍यांची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या पडताळणीनंतर अशाच प्रकारचे सिमेंट बंधारे जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात बांधण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही जी. श्रीकांत यांनी सांगितले. तत्पूर्वी मारोडी येथील सिमेंट बंधार्‍याचे जलपूजन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष टाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, गटविकास अधिकारी डी.एस. बचुटे,जिल्हा परिषद सदस्य निकिता रेड्डी, पंचायत समिती सभापती गंगूबाई धामोळे, पंचायत समिती सदस्य रामचंद्र घावट, सरपंच उषा खोडके, उपसरपंच सुशिला खोडके, शाखा अभियंता डी.एस. रणबावरे, ग्रामसेवक संजय खर्चान उपस्थित होते.