शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेवर अवकळा

By admin | Updated: March 17, 2015 01:05 IST

दुष्काळाच्या झळा; धान्य बाजार, सराफा, कापड व्यवसायात मंदीचे सावट.

विवेक चांदूरकर / अकोला: यावर्षी शेती व्यवसायात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर पडला आहे. सराफा, कापड व भाजीपाला आदी व्यवसायांवर अवकळा पसरली आहे. शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे बाजारपेठेतील आत्माच हरविला आहे. त्यातच गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यामुळे झालेल्या भाववाढीने सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. २0१४ - १५ वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फळबागा, भाजीपाला उत्पादकांसह सर्वच शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागला असून, शेती व्यवसाय डबघाईस आला. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर पडला. धान्य बाजारासह सोने व कापड विक्रेत्यांनाही यावर्षी मंदीचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांसोबतच व्यापारीही त्रस्त झाले आहेत. सोन्याचे भाव कमी होत असल्यामुळे गुंतवणूक म्हणून कर्मचार्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सराफा व्यवसाय यावर्षी विवाह सोहळे व शेतकर्‍यांवरच प्रामुख्याने निर्भर होता; मात्र शेती व्यवसायातील नुकसानामुळे सोने खरेदी-विक्रीत २0 ते ३0 टक्क्यांनी घट आली आहे. कापड व्यवसायावरही मंदीचे सावट जाणवत आहे. कापड व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड विक्रीत १0 ते १५ टक्के घट आली आहे. विवाह सोहळ्यांकरिता महागडे व मोठय़ा प्रमाणात कपड्यांची खरेदी करण्यात येते; मात्र ग्रामीण भागात यावर्षी विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे वस्त्रांची खरेदी कमी झाली आहे. गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. भावात वीस ते तीस टक्के वाढ झाल्याचा थेट प्रभाव सामान्य ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून आयात करावी लागत आहे. मोठे व्यावसायिक, किरकोळ दुकानदारांसह ग्राहकांनाही दुष्काळाची झळ बसत आहे.