शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-यांशी संगनमत करणार्‍या बाजार समित्या बरखास्त करणार!

By admin | Updated: April 23, 2017 01:35 IST

व्यापार्‍यांशी संगनमत करू न शेतक-यांना लुटणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्या जाणार असल्याचा इशारा राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी येथे दिला.

अकोला : नाफेडच्या खरेदी केंद्रावर व्यापार्‍यांशी संगनमत करू न शेतकर्‍यांना लुटणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्या जाणार असल्याचा इशारा राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी येथे दिला.शासनाच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या उपक्रमांतर्गत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्व. डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित कार्यशाळेत कृषी मंत्री बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे विभागीय संयुक्त संचालक एस.आर. सरदार, डॉ. पंदेकृविचे प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.उन्नत शेती योजनेवर बोलताना कृषी मंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढेल, यावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले. याकरिता कृषी विभागाने विविध कार्यक्रम येत्या खरीप हंगामात राबविण्याचे ठरविले आहे. आता थेट कृषी विभाग ते शेतकरी असा संवाद राहणार असून, शेतकर्‍यांनी यंत्र खरेदी करायचे, कृषी विभाग त्यांना अनुदानाचा धनादेश देईल. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत कृषी अवजारांची खरेदी बंद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी सव्वाकोटी शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीक विमा काढला होता. यावर्षी तो दीड कोटींपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे. मागील वर्षी पंतप्रधान पीक विमा काढण्यात देशात जालना जिल्हा प्रथम आला होता. यावर्षी प्रत्येक जिल्हय़ात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांचेही प्रबोधन केले जाणार आहे. रोहिणी नक्षत्रापासून राज्यात शेती जनजागृती पंधरवडा साजरा केला जाणार असून, शेतकर्‍यांना शेती, प्रक्रिया, उद्योगाची इत्थंभूत माहिती शेतकर्‍यांना दिली जाणार आहे.बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतमालासाठी गोदामे उभारणार असून, आठ हजार कांदा चाळी उभारण्याचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांचा शेतमाल, सीताफळ कृषी विभाग खरेदी करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक सरदार यांनी केले. यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते शेतकर्‍यांना धनादेश दिले.यावेळी गौतम शिरसाट या शेतकर्‍याला व कृषी यांत्रिकीकरणांतर्गत ट्रॅक्टर व पीक कापणी यंत्रासाठी रवींद्र गोपनारायण यांना कृषी मंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. आत्मा एमएसीपी अंतर्गत शेतकरी सामुदायिक उत्पादन सुविधा उभारण्याकरिता कृषिरत्न फार्म व हिरकणी फार्म यांच्या प्रतिनिधींनाही धनादेशाचे वितरण करण्यात आले.खारपाणपट्टय़ाची समस्या सोडविण्यासाठी जागतिक बँकेचे साह्य-अमरावती व अकोला जिल्हय़ातील सुमारे एक हजार गावातील खारपाणपट्टय़ाची समस्या सोडविण्यासाठी जागतिक बँकेने सुमारे चार हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. या माध्यमातून खारपाणपट्टय़ातील जमिनीतील क्षार काढून जमीन सुपीक केली जाणार आहे. शेतकर्‍यांनी कोणत्याही परिस्थिती निराश होऊ नये. शासन सदैव खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील, असा दिलासा कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांना द्यावा, अशी सूचनाही फुंडकर यांनी केली.