शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

माळरानात उगवणारी ‘बावची’ अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल

By admin | Updated: January 12, 2017 20:19 IST

माळरानातील धु-यांवर उगवणारी ‘बावची’ मोठ्या प्रमाणात अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. उडीद पिकासमान दिसणारे ‘बावची’चे बीज त्वचाविकारांवर गुणकारी

- राम देशपांडे/ऑनलाइन लोकमत
 
अकोला, दि. 12 - माळरानातील धु-यांवर उगवणारी ‘बावची’ मोठ्या प्रमाणात अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. उडीद पिकासमान दिसणारे ‘बावची’चे बीज त्वचाविकारांवर गुणकारी असून, त्यास विदर्भासह पूर्व प्रांतात अधिक मागणी असल्याने अकोल्यासह वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी विकलेली ‘बावची’ अकोल्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. 
त्वचाविकारांवर गुणकारी ठरणा-या ‘बावची’ या वनस्पतींचे अनेक औषध उपयोग आहेत. ‘बावची’ ही आयुर्वेदिक वनस्पती बावच, भवानी, बकुची, चंद्रलेखा, कालमेशी, शशिलेखा, सोमराजी, सुगंध कंटक, कुष्ठनाशिनी आदी नावांनी ओळखली जाते. त्वचाविकारात अग्रणी समजल्या जाणाºया ‘बावची’चे झुडुप छोटे, पाने हृदयाकृती आणि गोलाकार असतात. बावचीची फुले व फळे गुच्छानेच येतात. निळ्या रंगाची तुरे, तर फळ काळ्या रंगाचे असते, फळातले बीजही काळ्या रंगाचे व विशिष्ट सुगंध येणारे असते. बावचीला हिवाळ्यात फुले व फळे येतात. औषधासाठी बावचीचे बीज व बीजातून काढलेले तेल वापरले जाते. वाटलेल्या ‘बावची’च्या बिया पेट्रोलियम जेलीमध्ये मिसळून डागांवर लावल्यास डाग हळू हळू कमी होतात. ‘बावची’चे बीज विरेचक व कृमिनाशक असून, कुष्ठरोग, पांढरे कोड, खरुज, त्वचारोग आदी त्वचारोगांवर अत्यंत गुणकारी असल्याची माहिती पुणे येथील वनशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिगांबर मोकाट यांनी ‘लोकमत’ला दिली. विदर्भासह पूर्व प्रांतात बावचीला अधिक मागणी असल्यामुळे अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील माळरानात उगवणारी ‘बावची’ अकोल्यातील व्यावसायिकांमार्फत नागपूरच्या बाजारपेठेत पोहोचते.