शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पती व सासूच्या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

By admin | Updated: January 30, 2015 01:37 IST

अकोल्यातील घटना; स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह काढून केले शवविच्छेदन.

अकोला: विवाहितेचा मृत्यू नैसर्गिक नसून, पती व सासूने केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरकडील नातेवाईकांनी केल्यामुळे रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी विवाहितेचा गडंकी स्मशानभूमीमध्ये पुरलेला मृतदेह न्यायालयाची परवानगी घेऊन बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन केले. दहीहांडा वेसजवळ राहणारे शेख बशीर शेख हबीब (३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण तहेरीन तबस्सुम मोहम्मद उजेर (३१) हिचा विवाह ४ जानेवारी २00४ रोजी मोमीनपुर्‍यातील मोहम्मद उजेर हाफीज गुलाम मोहम्मद (४0) याच्यासोबत झाला होता. तहेरीनला एक मुलगी व दोन मुले आहेत. बहिणीला पती व सासू किरकोळ कारणांवरून त्रास देत होते. पती मोहम्मद उजेर याने घर बांधण्यासाठी तहेरीनला माहेरावरून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले होते. माहेरकडील नातेवाईकांनी रक्कम दिली नाही; परंतु दरमहा मुलांच्या शिक्षणाचा खर्च देण्यात येत होता. २७ जानेवारी रोजी मोहम्मद उजेर याने घरी येऊन तहेरीन आजारी असल्याचे सांगितले होते आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीकडील व माहेरकडील नातेवाईकांनी तिचा अत्यसंस्कारही केला; परंतु तहेरीनची मुलगी ऐतन जाहेरा हिने तिच्या आईला २३ जानेवारीला मोहम्मद उजेरने बेदम मारहाण केली होती. त्यात ती खाली कोसळली होती, अशी माहिती सांगितल्याने माहेरच्यांना संशय आला. तहेरीनचा मृत्यू नैसर्गिक नसून, पती व सासूने केलेल्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप शेख बशीर यांनी केला.शेख बशीरच्या तक्रारीमुळे रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी गडंकी स्मशानभूमीत पुरलेला तहेरीनचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. सध्या पोलिसांनी तहेरीनच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.