शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

झेंडू उत्पादकांच्या पदरात निराशाच!

By admin | Updated: October 31, 2016 23:23 IST

व-हाडातील झेंडूच्या शेतीचा ताळेबंद तोट्यात; ५ ते १0 रुपये किलोचा मिळाला भाव.

ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. ३१- पश्‍चिम वर्‍हाडात यावर्षी झेंडू फुलाचे उत्पादन वाढले; मात्र यामुळे झेंडू फुलांच्या भावात मोठी घसरण झाली असून, सरासरी ५ ते १0 रुपये प्रतिकिलोचा भाव झेंडूला मिळाला.दसरा व दिवाळी या दोन सणांमध्ये एकराला जवळपास ३८ क्विंटल झेंडूचे उत्पादन झाले. यामध्ये एका एकराला सरासरी खर्च ३५ हजार रुपये लागला असून, उत्पादन मात्र ३0 हजार रुपयांपर्यंतच झाले. यावर्षी पश्‍चिम वर्‍हाडातील झेंडूच्या शेतीचा ताळेबंदच तोट्यात गेल्याने दसर्‍याबरोबर दिवाळीतही झेंडू उत्पादकांच्या पदरात निराशेचे फूल पडले. यावर्षी झेंडू पिकाला असलेले पोषक वातावरण मिळाल्याने झेंडूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर झाले. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतले. दसरा सणाला झेंडूची आवक वाढल्याने भाव पडले. परिणामी, झेंडू उत्पादक शेतकर्‍यांना केवळ ५ रुपये प्रतिकिलोने झेंडूची विक्री करावी लागली, तर दिवाळी सणाला झेंडूच्या दुसर्‍या तोडणीमध्ये एकरी सरासरी १५ क्विंटल झेंडूचे उत्पादन झाले; मात्र दिवाळीतही शेतकर्‍यांना झेंडूचे भाव १0 रुपये प्रतिकिलोच मिळाले, तर विक्रेत्यांनाही १0 ते १५ रुपये किलोने झेंडूची विक्री करावी लागली. त्यामुळे विक्रेते व शेतकरी दोघांनाही दसर्‍यापाठोपाठ दिवाळीमध्येही झेंडूच्या फुलातून तोटाच सहन करावा लागला. परजिल्ह्यातील आवक झाली बंद!पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यामध्ये दसरा व दिवाळीला परजिल्ह्यातून झेंडूच्या फुलाची आवक होत होती; परंतु यावर्षी पश्‍चिम वर्‍हाडातच झेंडूची आवक वाढली व त्याला भावही पाहिजे तेवढा मिळत नाही. त्यामुळे वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने यावर्षी परजिल्ह्यातील झेंडूची आवक बंद झाली होती. अत्यल्प भाव असल्यामुळे शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या झेंडूची विक्री स्थानिक बाजारातच केली. लाखोंची उलाढाल आली हजारोंवरगेल्या तीन वर्षांपासून झेंडूला ७0 ते १00 रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत गेले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या बाजारात दसरा व दिवाळीला लाखोंची उलाढाल होत होती; मात्र यावर्षी पहिल्यांदाच झेंडूला ५ ते १0 रुपये किलोचा भाव आल्याने लाखोंची उलाढाल हजारोवर येऊन ठेपली. झेंडूला मातीमोल भाव मिळत असल्याने झेंडूच्या उत्पादनासाठी लागलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकर्‍यांनी स्वत: रस्त्यावर बसून झेंडूची विक्री केली.