शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मराठी भाषा विभाग सरसावला!

By admin | Updated: September 28, 2016 01:30 IST

पश्‍चिम व-हाडात विविध कार्यक्रमांचे आयोजन

वशिम, दि. २७- वाचन संस्कृती जोपासण्यासाठी राज्याचा मराठी भाषा विभाग सरसावला असून, याचा पहिला प्रयत्न म्हणून माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दृष्टिकोनातून पश्‍चिम वर्‍हाडात नियोजन केले जात आहे.विविध कारणांमुळे पूर्वीच्या तुलनेत आता वाचन संस्कृती कमी होत असल्याचे दिसून येते. ह्यवाचाल तर वाचालह्ण ही म्हण केवळ पुस्तकापुरतीच र्मयादीत राहत असल्याचे वास्तव आहे. वाचन संस्कृतीला गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग प्रयत्नशील असल्याचे आहे. या प्रयत्नाचा पहिला भाग म्हणून माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ह्यवाचन प्रेरणा दिनह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेत किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात येणार आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने आपले स्नेही, मित्र, कुटुंबातील सदस्यांना किमान पुस्तक भेट द्यावे, अशी अपेक्षा मराठी भाषा विभाग बाळगून आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दिवशी वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल, असे संदेश प्रसारित करण्याच्या सूचनाही मराठी भाषा विभागाने शासकीय-निमशासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्थांना दिल्या आहेत. शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्था आदिंनी व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामुहिक वाचन, ग्रंथप्रदर्शन यासह अन्य काही स्पर्धा असे उपक्रम राबविण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत.