शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सेवा संघ करणार सिंहावलोकन

By admin | Updated: August 30, 2014 01:17 IST

मराठासेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांची अकोला येथे पत्रकार परिषदेत माहिती.

अकोला : महाराष्ट्रातील मराठा समाजातील पोट जाती व बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन, प्रबोधन, जागृती व प्रत्यक्ष कृती यासाठी १ सप्टेंबर १९९0 साली मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. याला आता १ सप्टेंबर रोजी २४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त केंद्रीय कार्यकारिणी राज्यव्यापी दौरा करणार असून, २४ वर्षांतील कार्याचे सिंहावलोकन करणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी शुक्रवारी येथील आर. टी.ओ. कार्यालयासमोरील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्त्तम तायडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांची उपस्थिती होती. कामाजी पवार पुढे म्हणाले की, शिक्षणसत्ता, धर्मसत्ता, प्रचार-प्रसार माध्यम सत्ता व अर्थसत्ता या पाच सत्तांचा उपयोग बहुजन समाजासाठी झाला पाहिजे, यासाठी मराठा सेवा संघाने नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे. या सत्तांना ताब्यात घेण्यासाठी जनमत तयार करण्याचे काम संघटना गत २४ वर्षांपासून करीत आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रदेश महासचिव मधुकर मेहेकरे व अन्य पदाधिकार्‍यांसह आपण राज्यव्यापी दौरा करीत आहे. या दौर्‍याची सुरुवात विदर्भातून होत आहे. यादरम्यान विचारवंत, उद्योजक, शेतकरी व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणे व त्या दृष्टीने मराठा सेवा संघाच्या चळवळीत योग्य बदल घडवून अधिक परिणामकारक व गतिशील वाटचाल होण्याच्या दृष्टीने हा दौरा आखण्यात आला आहे. मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने मंत्रालयात राष्ट्रमाता मॉ जिजाऊची प्रतिमा लावणे, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे व इतिहास संशोधन व बळीराजा संशोधन केंद्राच्या माध्यमातून खरा वास्तववादी इतिहास समोर आणण्याचे काम करीत असल्याची माहिती पवार यांनी दिली. *१ सप्टेंबरला महाअधिवेशन गेल्या २४ वर्षांतील मराठा सेवा संघाच्या कार्याचे मूल्यांकन त्रयस्थांकडून करून घेण्यासाठी व भावी वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून, अकोला येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाअधिवेशन १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.