शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोपर्डी हत्याकांडाचा निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा

By admin | Updated: September 11, 2016 17:21 IST

कोपर्डी हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील मराठा समाज एकजूट होत आहे.

 ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ११- कोपर्डी हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील मराठा समाज एकजूट होत आहे. त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्यातही सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने क्रांतीमोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी रविवार ११ सप्टेंबर रोजी स्थानिक वाटाणे लॉन्स येथे आयोजित बैठकीला उपस्थित समाज बांधवांनी गर्दीचा उच्चाक मोडला. बैठकीत २५ सप्टेंबरला मोर्चा काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला.  
 
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाºया आरोपींविरूध्द तातडीने दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना फासावर लटकवावे, मागील दहा वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठा समाजातील शेतक-यांच्या झाल्या असून, आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील शेतक-यांच्या पाल्यांना नोकरीत समावून घ्यावे, ईबीसीची सवलत मर्यादा सहा लाखापर्यंत वाढवावी, ‘अ‍ॅक्ट्रॉसिटी अ‍ॅक्ट’मधील  गंभीर बाबी काहीअंशी शिथिल करून कायद्यात सुधारणा करावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी वाशिम येथे क्रांतीमोर्चा काढण्यात येणार आहे़ 
 
या क्रांतीमोर्चात जिल्ह्यातील लाखो समाजबांधव सहभागी व्हावेत, यासाठी गत १५ दिवसांपासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. समाजातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, विधीज्ञ, प्राध्यापक, शिक्षकांसह शेतकरी, शेतमजुरांसह महिला, युवक-युवतींनी मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी आवाहन केले जात आहे़ त्यानुषंगाने वाशिम येथील वाटाणे लॉन्स येथे रविवारी समाजबांधवांची मोठी बैठक पार पडली. 
 
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे वाशिम येथे देखील अतिविराट मोर्चा काढून मराठा समाजाने एकजूटीची क्रांती घडवून आणावी. शांततेच्या मार्गाने निघणाºया या क्रांतीमोर्चात समाजातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.