शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालधक्का परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी!

By admin | Updated: March 31, 2017 01:57 IST

जिल्हाधिका-यांचा आदेश; रात्री ९ पर्यंत प्रवेशास मनाई.

अकोला, दि. ३0- शहरातील रेल्वे स्टेशन भागात मालधक्का परिसरात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी दिला. अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. याच परिसरात मालधक्का असल्याने जड वाहनांची वर्दळ असल्याने, या भागात अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, रेल्वे स्टेशन भागातील मालधक्का ३१ मार्चपर्यंत इतरत्र हलविण्याचा ह्यअल्टिमेटमह्ण गत ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रेल्वे प्रशासनास दिला होता. या पृष्ठभूमीवर शहरातील वाहतुकीच्या योग्य नियोजनासाठी मालधक्का येथून जड वाहतूक करणारी वाहने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बाहेर जाणार नाहीत, अशी विनंती महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि जनरल कामगार संघटना व रेल्वे मालधक्का येथील सर्व माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगारांच्या वतीने गत १६ मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यानुषंगाने ३0 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित संघटना, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रेल्वे प्रशासन आणि पोलीस विभागाच्या अधिकार्‍यांसह महाराष्ट्र राज्य विकास माथाडी आणि जनरल कामगार संघटना व ट्रान्सपोर्ट पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीतील चर्चेत ठरविण्यात आल्यानुसार रेल्वे स्टेशन भागातील मालधक्का परिसरात रात्री ९ ते सकाळी ७ या कालावधीतच जड वाहनांना प्रवेश राहणार असून, सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला. या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक डी.जी. पोटभरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे प्रवीण महाडे, रेल्वे स्टेशन प्रबंधक जी.पी. मीणा, अ.वि. निमजे, माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या अकोला शाखा अध्यक्ष साधना गावंडे, विनोद दळवी उपस्थित होते.