शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गाड्या वळविल्या अकोलामार्गे

By admin | Updated: August 6, 2015 01:15 IST

इटारसीजवळील अपघाताचा परिणाम; द.मध्यच्या ४ गाड्या रद्द.

अकोला : मंगळवारी कामयानी एक्स्प्रेसला इटारसीजवळ झालेल्या अपघातानंतर अनेक गाड्या अकोला मार्गे वळविण्यात आल्या आहेत. इटारसीमार्गे नागपूरवरून भुसावळकडे आणि भुसावळवरून नागपूरकडे जाणार्‍या गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत २५ पेक्षा अधिक गाड्या अकोला मार्गे धावल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपघातामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. भोपाळ मंडळातील हरदा या रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी कामयानी एक्स्प्रेसला अपघात घडला. अपघाताची भीषणता अधिक असल्याने इटारसीमार्गे अप आणि डाऊन लाइन पूर्णत: ठप्प झाली आहे. इटारसीमार्गे भुसावळवरून नागपूरकडे जाणार्‍या, तसेच नागपूरवरून भुसावळकडे जाणार्‍या बहुतांश गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले असून, बुधवारी सायंकाळपर्यंंत ५१२६, २१८८, १६५५, २१४९, ३२0२, १0१५, १४0७, १0५७, २१६७ याव्यतिरिक्त २५ पेक्षा अधिक गाड्या अकोला मार्गे धावल्या. मार्गपरिवर्तन करण्यात आलेल्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सुविधेकरिता अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व २ वर विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून, बुधवारी स्थानिक यंत्रणा कसोशीने कामाला लागली असल्याचे दिसून आले. पश्‍चिम मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने येत्या काळात अनेक गाड्या अकोलामार्गे वळविण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी 'लोकमत' ला दिली.