शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्तीला अनेक पोलिसांचा ठेंगा!

By admin | Updated: March 2, 2016 02:46 IST

सवलतीच्या दरातील हेल्मेट घेण्यासाठी पोलिसांच्या रांगा.

सचिन राऊत /अकोलाजिल्हय़ातील दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना १ मार्चपासून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हेल्मेट सक्ती केली; मात्र अकोला पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी या हेल्मेट सक्तीला ठेंगा दाखविल्याचे मंगळवारी दिसून आले. प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अनेक पोलीस कर्मचारी विना हेल्मेटचेच दुचाकीवर फिरत असल्याचे पहिल्याच दिवशी निदर्शनास आले.राज्यातील सर्वच जिल्हय़ात दुचाकीवर फिरणार्‍या दोघांनाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. अनेक शहरांमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली असून, अकोला शहरातही दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यापूर्वी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हेल्मेट घालून असणे व नियमांचे पालन करताना दिसले पाहिजेत, असे आदेश पोलीस अधीक्षक मीणा यांनी दिले होते. १ मार्चपासून प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी दुचाकीवर हेल्मेट घालूनच फिरेल, असे स्पष्ट करण्यात आले; मात्र मंगळवार, १ मार्च रोजी प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अनेक पोलीस कर्मचारी विना हेल्मेटचेच फिरताना दिसले. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांसह महिला पोलीस कर्मचारी हेल्मेट सक्ती असतानाही विना हेल्मेटचेच फिरत होते. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी दुचाकीवर फिरताना हेल्मेट सक्तीला स्पष्ट ठेंगा दाखविल्याचे यावरून स्पष्ट झाले. पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्ती करताना पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना तब्बल एक महिन्याचा कालावधी दिला; मात्र त्यानंतरही पोलीस अधीक्षकांच्या आदेशाकडे अधिकारी व कर्मचार्‍यांनी पहिल्याच दिवशी कानाडोळा केल्याचे वास्तव आहे.हेल्मेट न वापरणार्‍या ११ पोलिसांवर कारवाईशहरात विना हेल्मेट फिरणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक मीणा व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात एक पथक कार्यरत होते. या पथकाने ११ पोलीस कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. हेल्मेट न घालणार्‍या प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याला प्रत्येकी १00 रुपये दंड आकारण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्तीचा विषय गांभीर्याने घेतल्यानंतर सर्वच ठाणेदारांनी कर्मचार्‍यांना बुधवारपासून हेल्मेट घालूनच पोलीस स्टेशनमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत.सवलतीच्या दरातील हेल्मेटचा तुटवडापोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात हेल्मेट उपलब्ध करण्यात आले आहेत; मात्र पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची मागणी जास्त आणि हेल्मेटचा पुरवठा कमी असल्याने अनेक पोलिसांना हेल्मेटच मिळाले नाहीत. त्यामुळेही अनेक पोलीस कर्मचारी विना हेल्मेटचे रस्त्यावर फिरत असल्याची माहिती आहे. पोलीस कर्मचार्‍यांसाठी ४४ टक्के सवलत दरात उपलब्ध करून देण्यात आलेले हेल्मेट खरेदी करण्यासाठी पोलीस मुख्यालयात मंगळवारी सायंकाळपासून चांगलीच गर्दी झाली होती.