शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मनपात रंगले ‘पत्रयुद्ध’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 02:17 IST

विजय अग्रवाल यांचे आयुक्तांना पत्र: तुघलकी आदेश रद्द करा!

अकोला: महापालिका पदाधिकार्‍यांच्या बैठकीला पूर्वपरवानगीशिवाय उपस्थित राहून त्यांना प्रशासकीय माहिती उपलब्ध करून दिल्यास विभाग प्रमुखांसह कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आयुक्त अजय लहाने यांनी जारी केलेला आदेश आधारहीन व नियमबाह्य आहे. लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवण्याचे काम आयुक्तांनी तातडीने बंद करून जारी केलेला आदेश रद्द करावा, अन्यथा नाइलाजाने लोकप्रतिनिधींसह शासनाकडे तक्रार करावी लागणार असल्याचा इशारा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी मंगळवारी आयुक्तांना पत्राद्वारे दिला.महापालिकेतील सत्ताधारी भाजप व आयुक्त अजय लहाने यांच्यात अधिकाराच्या मुद्यावरून एकमेकांवर मात करण्यासाठी जोरदार सामना रंगला आहे. हा सामना अकोलेकर मोठय़ा उत्सुकतेने पाहत असले तरी यामधून शहराचे हित साधल्या जाणार नसल्याची जाणीव सर्वांनाच होत आहे. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रशासनाकडे पडून असलेल्या नगरोत्थानच्या ठरावावरून आयुक्तांवर निशाणा साधत थेट शिस्तभंगाच्या कारवाईचे पत्र दिले. महापौरांच्या पत्राला चोवीस तासाचा अवधी उलटत नाही तोच आयुक्तांनी पदाधिकार्‍यांना माहिती देण्यापूर्वी आयुक्तांची पूर्वपरवानगी घेण्याचा आदेश विभाग प्रमुखांना जारी केला. आयुक्तांची परवानगी न घेतल्यास विभाग प्रमुखांसह कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे नमूद केल्याने कर्मचार्‍यांची कोंडी झाली आहे. आता आयुक्तांच्या आदेशाला प्रत्युत्तर देण्यासाठी महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल पुढे सरसावले. त्यांनी आयुक्तांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये समाविष्ट विविध कलम, पोटकलमांची आठवण करून देत प्रशासनाने जारी केलेले आदेश निराधार व नियमबाह्य असल्याची आठवण करून दिली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसून आपण स्वत:च नियमबाह्य कामे करीत असल्याचा आरोप विजय अग्रवाल यांनी केला आहे.