शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला न्यायालयाची चपराक!

By admin | Updated: April 2, 2017 02:53 IST

बसस्थानकाची भिंत पाडण्याचे प्रकरण; अधिका-यांनी दिली चुकीची कबुली

अकोला, दि. १- मध्यवर्ती बसस्थानकाला लागून असलेली राज्य परिवहन महामंडळाची भिंत मनपाने अतिक्रमण असल्याचे कारण सांगून २00७ मध्ये पाडल्यानंतर याविरोधात परिवहन महामंडळाने न्यायालयात धाव घेतली होती. यावर प्रथमश्रेणी न्यायालयाने मनपाच्याविरोधात निकाल देत ही भिंत अतिक्रमणात नसल्याचे स्पष्ट करीत ही भिंत पाडल्यामुळे न्यायालयाने मनपाला चांगलीच चपराक दिली.महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने २00६-0७ मध्ये मध्यवर्ती बसस्थानकाला लागून असलेली परिवहन महामंडळाची भिंत रुंगठा पेट्रोल पंप ते एलआरटी कॉलेजपर्यंंंत डीपी रोड करण्यासाठी पाडली होती, याविरोधात महामंडळाने न्यायालयाने धाव घेतली. ३१ डिसेंबर १९७५ रोजी जिल्हाधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळामध्ये झालेल्या करारानुसार ही जागा महामंडळाला सदर जागेचे मोजमाप करून, नकाशा मंजूर केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर ताब्यात देण्यात आली होती. या मोबदल्यात परिवहन महामंडळाने एकरकमी पैसेही जमा केले होते; मात्र मनपाने २00७ मध्ये ही भिंत पाडली होती. भिंत तोडल्यानंतर महामंडळाने न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, की एसटीला या जागेची मालकी करारानुसार देण्यात आली आहे. सदर जागेचा हक्क मागण्याचा अधिकार मनपाला नसल्याचे करारात नमूद करण्यात आले आहे; मात्र अकोल्याच्या विकासासाठी ही जागा हवी असल्यास मनपाने योग्य त्या प्रक्रिया पार पाडून योग्य पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फतच ही जागा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया करावी, असे करारात नमूद आहे. त्यानंतरही मनपाने ही भिंत पाडली होती. याविरोधात परिवहन महामंडळाच्या विधिज्ञ स्व. मोहन देशमुख आणि आशिष देशमुख यांनी न्यायालयात दावा दाखल केला, सोबतच पुरावेही सादर केले. मनपाच्या नगररचना विभागाने सदर जागेच्या मालकी हक्काबाबत आमची अनभिज्ञता आणि माहितीच नसल्याची कबुली न्यायालयात दिल्यानंतर आणि झालेला प्रकार हा चुकीचा असल्याचे मनपाने कबूल केल्यानंतर न्यायालयाने मनपाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना यापुढे महामंडळाच्या जागेत अनधिकृतरीत्या प्रवेश करता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. या जागेचे मनपाला हस्तांतरण गरजेचे असेल, तर त्यांनी योग्य त्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रियेतून जागेचे हस्तांतरण करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे स्व. अँड. मोहन देशमुख यांनी दावा दाखल केला होता, तर त्यानंतर महामंडळातर्फे हा दावा अँड. आशिष देशमुख यांनी न्यायालयात पुढे चालविला.