अकोला : राजभवन (मुंबई) निर्देशित आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकताच पार पडला. यामध्ये उंच उडी या क्रीडाप्रकारात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत अकोला येथील मनोज मारोडे कांस्यपदक पटकावले. त्याने १.७१ एवढे अंतर नोंदवले. स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथील विद्यापीठ संघांचा समावेश होता.
आंतरविद्यापीठ स्पर्धेत मनोज मारोडेला कांस्यपदक
By admin | Updated: December 2, 2014 23:34 IST