शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याचे दर आटोक्यात; निर्बंधांमुळे विक्री मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:26 IST

Akola News : आंब्यांचे दर आटोक्यात असले तरी बाजार बंद असल्याने विक्री मंदावली आहे.

अकोला : कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे; परंतु या निर्बंधांचा फटका आंब्यालाही बसला आहे. यावर्षी आंब्यांचे दर आटोक्यात असले तरी बाजार बंद असल्याने विक्री मंदावली आहे. त्यामुळे फळ विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. १५ मे पर्यंत सर्व बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसोबत फळ विक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झालेला आहे. या संकटाचा परिणाम आंब्याच्या दरांवर झाला. हापूस सोबत केशर, लालबाग, दशेरी आंब्याचे दर घटले आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हापूस आंब्याचा दर २५० ते ३५० रुपये प्रति डझन ठोकमध्ये आहे; मात्र विक्री मंदावल्याने अधिकांश आंबा सडण्याच्या मार्गावर आहे. यासह हापूस (कर्नाटक)चा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो, केशर ६०, लालबाग ३० रुपये आणि दसेरी आंब्यालाही ५० ते ६० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरम्यान, कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने व्यावसायिकांकडून नव्याने आंबा बोलावणे बंद झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाने १५ मे नंतर निर्बंध हटविल्यास, त्यापुढे आंबा विक्रीच्या व्यवसायाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

विक्री ठप्प; आंब्याचे नुकसान

९ मेपर्यंत जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ असे चार तास फळविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या काळात अकोला शहरातील फळ विक्रेत्यांनी भरपूर प्रमाणात आंबा उपलब्ध केला; मात्र ९ मे रात्रीपासून कडक निर्बंध लागू झाले. त्यामुळे फळविक्रीची दुकानेही बंद आहेत. यामुळे हापूससोबतच अन्य प्रजातींचा आंबाही जागीच सडत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली. हापूस आंब्याची मागणी झाल्यास विक्रेत्यांनी घरपोच डिलीव्हरीची सोय उपलब्ध केलेली आहे. विशेषत: रत्नागीरीच्या हापूस आंब्याला अधिक मागणी आहे.

 

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याची झाडे फळांनी अधिक प्रमाणात लदबदली आहेत. कोरोनामुळे बेभाव आंबा विकावा लागत आहे; परंतु योग्य नियोजन केल्यास यावरही मात करता येते. आम्ही थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

- डॉ.विजय म्हैसने, आंबा उत्पादक

 

टॅग्स :AkolaअकोलाMangoआंबा