शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या कन्यादानमध्ये मंगळसूत्र घोटाळा; ३४४ मंगळसूत्रांपैकी ४१ जोडप्यांनाच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:40 IST

अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२००५-०६ मध्ये कन्यादान योजना राबवताना घोटाळा झाल्याचे पुढे आले आहेअकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केला.प्रकल्प कार्यालयातील नोंदीनुसार केवळ ४१ मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप झाल्याचे आढळून आले.

-  सदानंद सिरसाटअकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. २००५-०६ मध्ये झालेल्या या घोटाळ््यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, एस.व्ही. बोबडे यांच्यावर फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे. मागणी केलेल्या ३४४ पैकी ४१ मंगळसूत्रांचेच लाभार्थींना वाटप झाले. त्यासाठी २० लाखांपेक्षाही अधिक निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.शासनाने नियुक्त केलेल्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम.के. गायकवाड यांच्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे. त्यानुसार विविध योजनांमध्ये घोटाळा केलेल्या अधिकाºयांवर फौजदारी कारवाईचे निर्देश सध्याच्या प्रकल्प अधिकाºयांना देण्यात आले. अकोला प्रकल्पासाठी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार २००५-०६ मध्ये कन्यादान योजना राबवताना घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. ३६० ते ४०० सामूहिक विवाहासाठी त्यावर्षी अनुदान देण्यात आले. त्यावेळी मागणीनुसार अकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केला. त्याची किंमत २० लाख ६४ हजार रुपये होती. तेवढ्याच संख्येत संसारोपयोगी वस्तूंचाही पुरवठा दुसºया प्रतिष्ठानकडून झाल्याची माहिती आहे. आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प कार्यालयातील नोंदीनुसार केवळ ४१ मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप झाल्याचे आढळून आले. त्याची किंमत अनुक्रमे ९ लाख ७१ हजार व ८ लाख २५ हजार रुपये आहे. त्यापैकी केवळ ४ लाख १० हजार रुपयांच्या मंगळसूत्रांचे वाटप झाले. त्यावेळी खर्च झालेल्या ४ लाख १० हजार रुपये वगळून ३५ लाख ८९ हजारांचे काय झाले, याची कोणतीच नोंद आदिवासी विकास विभागाकडे नाही. त्यामुळे मंगळसूत्र आणि संसारोपयोगी वस्तूंसाठी असलेल्या ३५ लाख ८९ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाºयांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती आहे.३४३ मंगळसूत्रे गेली कुठे?अकोल्यातील खंडेलवाल अलंकार ज्वेलर्सने मागणीनुसार ३४४ मंगळसूत्रांचा पुरवठा केल्याची नोंद आहे. मात्र, कार्यालयातील वस्तू वाटप नोंदवहीनुसार केवळ ४१ जोडप्यांनाच वाटप झाले. त्यामुळे उर्वरित ३४३ मंगळसूत्रे गेली कोठे की त्याचा पुरवठाच झाला नाही, ही बाब आता फौजदारी कारवाईतून पुढे येण्याचीही शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद