शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मंदा देशमुख यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:46 IST

अकोला: आगामी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अजय तापडिया यांनी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी महिला महानगर अध्यक्ष मंदा देशमुख यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. मंदा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र समोर आले आहे. 

ठळक मुद्देराष्ट्रवादीत धक्कातंत्र कायमपदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आगामी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख पदाधिकार्‍यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अजय तापडिया यांनी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी महिला महानगर अध्यक्ष मंदा देशमुख यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. मंदा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र समोर आले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका पार पडतील. त्यानुषंगाने प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असतानाच राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विजय देशमुख यांना उमेदवारी नाकारल्यानंतर देशमुख यांनी असंख्य सर्मथकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसला भगदाड पाडले होते. राकाँच्यावतीने विधानसभा निवडणूक लढणार्‍या विजय देशमुख यांना लक्षणीय मते मिळाली होती. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राकाँच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ देशमुख यांच्या गळ्य़ात घातली. फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने महिला महानगराध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा मंदा देशमुख यांच्याकडे सोपवली. सर्व काही सुरळीत चालू असतानाच पक्षातील कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यादरम्यान अचानक अजय तापडिया यांनी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ आता मंदा देशमुख यांनीसुद्धा पदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षात स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. 

काय म्हणाल्या देशमुख?पक्षात नवीन आलेल्या लोकांची अरेरावीची भाषा आणि वागणूक माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना अवघड जात होती. त्यामुळे वैचारिकदृष्ट्या काम करणे कठीण झाले आहे. पक्षात चांगले काम करणार्‍या व सक्रिय महिलांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे मंदा देशमुख यांनी नमूद केले आहे.