शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन ही शासनाचीच जबाबदारी

By admin | Updated: July 31, 2015 01:47 IST

शेतकरी प्रतिनिधी व वन्य प्राणीप्रेमींचे मत, मारणे हा पर्याय नाही.

अकोला : वन्य प्राणी पिके फस्त करीत असून, यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच निसर्गाची अवकृपा व शासनाच्या उदासीन धोरणामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर हे संकट ओढवले आहे. शेतकर्‍यांची अवस्था वाईट असून, त्यांना या समस्येपासून मुक्ती मिळायला हवी, हे सत्य असले तरी वन्य प्राण्यांना मारणे हा पर्याय नाही. शासनाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, असा सूर 'लोकमत'च्यावतीने गुरुवारी आयोजित परिचर्चेत निघाला. शासनाने २२ जुलै रोजी शेती पिकास धोकादायक ठरलेल्या रानडुक्कर व रोही यांचा बंदोबस्त करण्याबाबतचे परिपत्रक काढले. या विषयावर ह्यलोकमतह्णच्यावतीने गुरुवारी परिचर्चा आयोजित करण्यात आली. भारतीय जनता पक्ष किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, शिवाजीराव देशमुख, वन्यजीव विभागाचे अधिकारी दुबे, सामाजिक वनीकरणचे माहिती व प्रसारणप्रमुख गोविंद पांडे, विभागीय वनव्यवस्थापन समितीचे सल्लागार नीलेश डेहणकर, मानद वन्यजीव संरक्षक देवेंद्र तेलकर यांची उपस्थिती होती.या परिपत्रकामध्ये शासनाने रानडुक्कर किंवा रोही या वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी संबंधित वनक्षेत्रपाल यांच्याकडे अर्ज देऊन पोचपावती प्राप्त करावी. उपरोक्त तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल यांनी शहानिशा करून रानडुक्कर किंवा रोही पारध करण्याबाबत परवाना २४ तासांच्या आत निर्गमित करावा, जर २४ तासांच्या आत परवाना दिला नाही किंवा नाकारला नाही, तर अर्जदाराला परवाना देण्यात आलेला आहे, असे गृहित धरून पारध करण्याची मुभा राहील, असे नमूद केले आहे. यावर मत व्यक्त करताना यावेळी शेतकरी प्रतिनिधींच्यावतीने शासनाने शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांची पारध करण्याची परवानगी दिली असली तरी, हे काम शासनाचे असून, शासनानेच करावे, अशी भूमिका मांडली, तर वनविभागाचे अधिकारी व वन्य प्राणीप्रेमींनी वन्य प्राण्यांना मारणे हा पर्यायच नसून, त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.