शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्याच्या विकासासाठी ‘मॅनेजमेंट प्लॅन’

By admin | Updated: September 15, 2014 01:50 IST

१५ वर्षांचे नियोजन, इको टूरिझमवर भर

विवेक चांदूरकर /अकोलाविभागातील अभयारण्याचा विकास, पर्यटनात वाढ व पुढील १५ वर्षांचे नियोजन करण्यासाठी वन विभागाच्या वतीने व्यवस्थापन आराखडा (मॅनेजमेंट प्लॅन) तयार करण्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अभयारण्यांमध्ये पर्यटन कसे वाढेल, यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला आणि आकोट वनविभागांतंर्गत कोटपूर्णा, ज्ञानगंगा आणि नरनाळा अभयारण्य येते. या अभयारण्यांचा विस्तार पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यातही झाला आहे. काटेपूर्णा अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सध्या वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रत्येक १५ वर्षांंनी वनविभागाच्या वतीने अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. काटेपूर्णा, ज्ञानगंगा या अभयारण्याचा आराखडा २0१४ मध्ये संपुष्टात येणार असल्याने, २0१४-१५ चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये अभयारण्यातील झाडे, झुडूपे, वेली तसेच रोपट्यांची संख्या, घनता व सध्याची स्थिती यासंदर्भातील सर्वच माहिती गोळा करण्यात येते. जंगलातील तृणभक्षी, मांसभक्षी प्राणी, त्यांची संख्या व पुढील १५ वर्षांनी तद्विषयक स्थिती काय राहील, याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येते. त्यानंतर या अभयारण्यात पुढील १५ वर्षे कोणती कामे करावी, झाडांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात येते. या अभयारण्यात दररोज किती पर्यटकांना प्रवेश द्यावा, त्यांच्या राहण्याची, सुरक्षेची व्यवस्था तसेच पर्यटनवाढीसाठी नवीन उपाययोजना कोणत्या करता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.