लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट स्टॅँडजवळ असलेल्या पोलीस चौकीच्या शेजारीच एका झाडाला ५० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मानेक टॉकीज परिसरातील रहिवासी संजय गोपाळराव मोरे (५०) हे शनिवारी पहाटे पाच ते साडेसहा वाजताच्या सुमारास कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या ठिकाणपासून काही अंतरावर असलेल्या एका भिंतीवर माझ्या मृत्यूला मीच कारणीभूत असल्याचे चुन्याने लिहिलेलेदिसून आले. पोलिसांनी त्याची नोंद घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह सकाळी शवविच्छेदनासाठी रवाना केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलीसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्हपोलीस चौकीपासून काही अंतरावरच या इसमाने आत्महत्या केली. त्यामुळे या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी घटनेच्या वेळी झोपले होते का, असा सवाल घटनास्थळावर उपस्थित करण्यात आला. एवढेच नव्हे, तर या चौकीमध्ये कर्मचारीही हजर नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त आता झोपेत सुरू असल्याची माहिती आहे.
मृत्यूचे नेमके कारण काय?या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली की घातपात आहे, यासाठी उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत असून, घटनेची सत्यता लवकरच समोर येणार असल्याचा विश्वास पोलिसांना आहे.