शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर ग्रामपंचायतीत फोडल्या घागरी

By admin | Updated: February 27, 2016 01:40 IST

पाण्यासाठी ग्रामस्थांचा संताप; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा.

अकोला: घरकुल, शौचालय योजनांचा लाभ मिळत नसल्याने आणि पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याच्या मुद्दय़ावर, शहरानजीकच्या मलकापूर येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आवारात घागरी फोडून तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.शासनाच्या इंदिरा आवास, रमाई आवास योजनेंतर्गत अकोला शहराजवळील मलकापूर गावात दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांची प्रतीक्षा यादी योग्य प्रकारे तयार करण्यात आली नाही. दारिद्रय़रेषेखालील पात्र लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आले. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमात शौचालय बांधकामासाठी दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना अनुदान दिले जाते; परंतु ग्रामपंचायतमार्फत या योजनेची गावातील ग्रामस्थांना माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे गावातील गरीब, अल्पसंख्याक नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तसेच पाणीटंचाईच्या परिस्थितीत गावात पाणीपुरठय़ाचे नियोजन योग्य करण्यात आले नसल्याने, नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुद्दय़ांवर सरपंचांनी राजीनामा द्यावा व ग्रामसेवकास तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करीत, शुक्रवारी ग्रामस्थांनी मलकापूर ग्रामपंचायत आवारात घागरी फेडून संताप व्यक्त केला. त्यानंतर या प्रश्नावर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मलकापूरचे देवेश पातोडे, सूर्यभान मोरे, शांताराम गोपनारायण, डिगांबर गोपनारायण, अविनाश इंगोले, भारत बोरकर, विजय अवचार, उद्धव वाकोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.