शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी सरसावला हिवताप विभाग

By atul.jaiswal | Updated: June 16, 2018 16:42 IST

अकोला : पावसाळ्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन हिवतापाचा प्रसार झपाट्याने होतो. किटकजन्य रोगांना जैविक पद्धतीने आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयालयाच्यावतीने १ जून ते ३० जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून राबविण्यात येत असून, या दरम्यान जिल्हाभरात डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देसखल भागांमध्ये साचलेले पाणी, डबके, नाल्या ही डासोत्पत्तीची स्थाने आहेत.खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साचेलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही. जिल्हाभरात डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

अकोला : पावसाळ्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन हिवतापाचा प्रसार झपाट्याने होतो. किटकजन्य रोगांना जैविक पद्धतीने आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयालयाच्यावतीने १ जून ते ३० जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून राबविण्यात येत असून, या दरम्यान जिल्हाभरात डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, एक उपजिल्हा रुग्णालय, ४ ग्रामीण रुग्णालये अंतर्गत येत असलेल्या भागांमध्ये साचलेल्या पाण्यात, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम सुरु आहे. सखल भागांमध्ये साचलेले पाणी, डबके, नाल्या ही डासोत्पत्तीची स्थाने आहेत. साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. अ‍ॅनोफिलीस जातीचा डास चावल्याने हिवताप होतो. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साचेलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही. यासाठी हिवताप विभागाच्यावतीने जिल्ह्यात सर्व ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात आल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अभिनव भूते यांनी सांगितले.गप्पी माशांचे मोफत वितरणकिटकजन्य रोगास आळा घालण्याकरीता जैवीक पद्धतीने प्रतिरोध करण्याकरीता तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालये, ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच शहरी स्तरावर नागरी आरोग्य केंद्र व जिल्हा हिवताप कार्यालय, अकोला या सर्व ठिकाणी गप्पी माशांचे मोफत वितरण करण्यात येत आहे.मोर्णा नदी पात्रातही सोडले गप्पी मासेमोर्णा नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात ज्या ठिकाणी करण्यात आली होती, त्या गडंकी भागातील नदीपात्रात गप्पी मासे सोडण्यात आले. नागरी आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सहाय्यक व आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यMedicalवैद्यकीय