शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, मूग, उडिदाचा सर्व्हे करुन शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:37 IST

अकोला जिल्हयातील सोयाबीन पीक मोठय़ाप्रमाणात वांझ निघाले असून, अनेक ठिकाणची फुलोरा गळती झाली, किडींनी आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मूंग, उडीद पीक तर हातचे गेले आहे. या सर्व पिकांचा सर्व्हे करू न शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाचे निवेदन शेतकरी जागर मंचाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी जागर मंच जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हयातील सोयाबीन पीक मोठय़ाप्रमाणात वांझ निघाले असून, अनेक ठिकाणची फुलोरा गळती झाली, किडींनी आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मूंग, उडीद पीक तर हातचे गेले आहे. या सर्व पिकांचा सर्व्हे करू न शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाचे निवेदन शेतकरी जागर मंचाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने शेतकरी आणखीच हतबल झाला आहे. यासंबधी तातडीने सर्वेक्षण करू न शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, जगदिश तायडे, रंगराव टके, दीपक गावंडे, ज्ञानेश्‍वर सुलताने, उज्वल काळमेघ, नारायण मावळे, रमेशराव मांगटे, शिवाभाऊ टेके, प्रशांत गावंडे,  विजय देशमुख, शेखअन्सार, ज्ञानेश्‍वर गावंडे, सैय्यद वासीफ, दिलीप मोहोड, किरण बोपटे, शिवाजीराव म्हैसने, मंगेश मांगटे, प्रशांत नागे आदी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी जाणून घेतली समस्या यावर्षी जिल्ह्यात अपुर्‍या पावसामुळे पिकाची वाढ योग्य प्रकारे न झाल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात  घट होणार आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याचे चित्र जिल्हाभरात आहे तर मूंग, उडीद पीक हातचे गेले आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीनीची झाडे जिल्हाधिकारी पाण्डेय यांना दाखविली. जिल्हाधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घेत योग्य ती दखल घेण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले.