शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाच्या मोबदल्यातील एक चतुर्थांश रक्कम पत्नीच्या नावे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 14:14 IST

लंघापूरच्या सरपंच छबूताई रामराव पाचडे गत पाच महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होताना पुनर्वसित ग्रामस्थांना शासनाकडून घर, जमिनीचा मोबदला व अनुदानाची रक्कमही मिळते. काही लाखांच्या घरात असणारी ही रक्कम कुटुंब प्रमुख म्हणून घरातील कर्त्या पुरुषांच्या बँक खात्यातच जमा होते. या रकमेतील किमान एक चतुर्थांश रक्कम ही कुटुंब प्रमुखाच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूरच्या सरपंच छबूताई रामराव पाचडे गत पाच महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त असल्याने ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाची एक संधी गमावत असल्याचे समोर आले आहे.अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पामुळे लंघापूर या गावाचे सिरसो येथील गायरानात पुनर्वसन करण्यात आले आहे. यासाठी मजुरांना २ हजार स्क्वेअर फूट तर शेतकऱ्यांना ४ हजार स्क्वेअर फूट जागा देण्यात आली आहे. या ग्रामस्थांना शेती व घराचा मोबदला मिळाला. कोरडवाहू शेती असेल, तर ६ लाख रुपये एकर, बागायती ९ लाख रुपये एकर, फळ बागायतदार १२ लाख रुपये या प्रमाणात रक्कम मिळाली. अवघी २७० घरे असलेल्या या गावात प्रत्येक घराच्या कर्त्या पुरुषाच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली. कर्ता पुरुष समंजस असला तर त्या रकमेचा विनियोग योग्य प्रमाणात होऊन पुनर्वसित गावात नव्याने संसार सुरू होतो; मात्र कुटुंब प्रमुखाने हा समंजसपणा दाखविला नाही, तर मात्र या रकमेला पाय फुटतात अन् अवघ्या काही महिन्यांत नादारीची स्थिती येते. पुनर्वसन झालेल्या प्रत्येक गावात अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे या रकमेतील एक चतुर्थांश हिस्सा हा महिलेच्या खात्यात टाकला तर तिच्या कुटुंबासाठीच या रकमेचा पुढे योग्य विनियोग होईल, याची किमान खात्री असते. त्यामुळेच लंघापूरच्या सरपंच छबूताई पाचडे यांनी ५ आॅक्टोबर २०१९ रोजी राज्याच्या प्रधान सचिवांपासून तर मूर्तिजापूरच्या उपविभागीय अधिकाºयापर्यंत सर्वांना पत्र पाठवून महिलांच्या खात्यात एक चतुर्थांश रक्कम वळती करण्याची विनंती केली होती; मात्र तत्पर प्रशासनाने हे पत्र विभागीय आयुक्तांकडे, आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकाºयांनी २० डिसेंबर रोजी मूर्तिजापूरच्या उपविभागीय अधिकाºयांकडे पाठवून आपली जबाबदारी पूर्ण केली. या कालावधीत पुनर्वसनाची रक्कम कुटुंब प्रमुखांच्या खात्यात जमा होऊन काही कुटुंबांमध्ये ती खर्चही झाली. त्यामुळे छबूतार्इंची चांगली कल्पना शासनाच्या लालफीतशाहीत अडकून पडली आहे.आता याच ग्रामस्थांना घरांसाठी अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात मोडणाºया ग्रामस्थांना ८ लाख ५१ हजार तर इतर प्रवर्गांसाठी ८ लाख १ हजार रुपये एवढी अनुदानाची रक्कम आहे. किमान या रकमेतील एक चतुर्थांश रक्कम तरी महिलांच्या खात्यात वळती करावी, यासाठी छबूताई पाचडे यांनी पुन्हा शासनाकडे विनंती केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने किमान याची दखल घेतली जाईल का, हा प्रश्नच आहे.

घराच्या नमुना ‘आठ अ’मध्ये महिलेचे नाव लिहिता म्हणजे ती अर्धी मालकीण आहेच, त्यामुळे पुनर्वसनाची अर्धी रक्कमच तिच्या हवाली केली पाहिजे. मी तर फक्त एक चतुर्थांशच द्यावी, अशी विनंती केली आहे. हा पैसा कुटुंबाच्याच कामी येणार आहे.-छबूताई रामदास पाचडे,सरपंच, लंघापूर.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर