शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गरजेनुसार बदल करा, अन्यथा शाळा बंद पडतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:30 IST

अकोला : मुलांच्या मेंदूशी नैसर्गिकरीत्या जुळणार्‍या, त्यांच्या वयोमानाला अनुसरून आणि वेगवेगळय़ा रचनावादी शिक्षणाच्या पद्धतीनुसार मुलांना शिकवावे, मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्‍वासाने शिकतात. आनंदातून आणि विधायक वातावरणात शिक्षण द्यावे, शाळांनी गरजेनुसार शिक्षणात बदल केला नाही, तर २0३0 पर्यंत शाळा बंद पडतील आणि शिक्षणाचे बाजारीकरण करणार्‍या शाळांचे पीक सुरू होईल, अशी भीती पुणे येथील प्रा. रमेश पानसे यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रा. रमेश पानसे यांचे मत बाबूजी देशमुख वाचनालयाची नवरात्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुलांच्या मेंदूशी नैसर्गिकरीत्या जुळणार्‍या, त्यांच्या वयोमानाला अनुसरून आणि वेगवेगळय़ा रचनावादी शिक्षणाच्या पद्धतीनुसार मुलांना शिकवावे, मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्‍वासाने शिकतात. आनंदातून आणि विधायक वातावरणात शिक्षण द्यावे, शाळांनी गरजेनुसार शिक्षणात बदल केला नाही, तर २0३0 पर्यंत शाळा बंद पडतील आणि शिक्षणाचे बाजारीकरण करणार्‍या शाळांचे पीक सुरू होईल, अशी भीती पुणे येथील प्रा. रमेश पानसे यांनी येथे व्यक्त केली. बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित नवरात्र व्याख्यानमालेत मंगळवारी परिवर्तनासाठी नवा शिक्षण व्यवहार विषयावर व्याख्यान देत होते. यावेळी विचारपीठावर प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. नारायण कुळकर्णी कवठेकर, प्रा. सुरेश राऊत, वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र होते. प्रा. पानसे यांनी मुलांना मुलांसारखे वागू द्यावे, त्यांना पालकांनी समजून घ्यावे, सध्याची मुले मुळातच हुशार आहेत. मुलांचे मालक म्हणून पालकांनी वागू नये, मुले ही भावी काळाची गुंतवणूक आहे, हा समज चुकीचा आहे. मुले ही मूलभूत हक्क असलेली स्वतंत्र व्यक्ती आहे, असे सांगत प्रा. पानसे म्हणाले, की मुलांना सर्वात जास्त शिकायला आवडते; परंतु सध्या शाळा आणि पालक मुलांना आवडीचे शिक्षण देण्यापेक्षा त्यांच्यावर शिक्षण लादत आहेत. शिकणे आणि शिकवण्याचे वातावरण कसे आहे, यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. मुक्त आणि मोकळे वातावरण असेल, तर मुले विश्‍वासाने शिकतात. मुलांच्या भावना समजून त्यांना प्रतिसाद देणे हे महत्त्वाचे आहे. मुलांना काही येत नाही म्हणून पालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगत त्यांनी सध्या इंग्रजी शाळांकडे कल वाढला आहे; परंतु आयएएस झालेल्या मुलांपैकी एकही इंग्रजी शाळेत शिकलेला नव्हता, असा दाखला देत त्यांनी मुलांना मराठी भाषेतच शिकू द्या, इंग्रजी शाळांमधील मुलांना धड इंग्रजीही येत नाही आणि मराठीही नाही. सेमी इंग्रजी हे पालकांना फसवण्याचे साधन झाले आहे. मुलांना विचार करायला लावणे, कल्पना करायला लावणे, दुसर्‍यांच्या भावनांशी जुळवून घ्यायला शिकवावे आणि पालकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे, शाळेत शिकताना त्याला जात, धर्म शिकवू नये, असेही प्रा. रमेश पानसे यांनी सांगितले. 

भारत तरुणांचा देश२0२५ मध्ये भारतातील तरुणांचे वयोमान सरासरी २९ असेल. जगात तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिल्या जात आहे. त्यामुळे परिपूर्ण तरुण घडविणारे शिक्षण त्यांना द्यावे लागेल. शिक्षणात आमूलाग्र बदल करून शिक्षणाची संधी आणि दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे, असे सांगत प्रा. रमेश पानसे यांनी रोजगाराची संधी तरुणांना मिळाली नाही, तर देश कोसळेल, असा इशारा दिला.