शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

प्रमुख जिल्हा मार्गांनाही दुर्लक्षाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:35 IST

अकोला : देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणवल्या  जाणार्‍या रस्त्यांकडे मात्र विकासाच्या झंझावातात किती  दुर्लक्ष केले जात आहे, याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील  हजारो किमीच्या रस्त्यांची कामेच सुरू झाली नसल्याच्या  माहितीतून पुढे येत आहे. जिल्हा परिषदेकडे १५00 किमी,  तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३७५ किमीपेक्षाही  अधिक किमी रस्त्यांची निर्मिती होणे बाकी आहे. त्यामध्ये  प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देसा. बां. विभागाकडे ३७५ किमीचे रस्ते मिसिंग!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणवल्या  जाणार्‍या रस्त्यांकडे मात्र विकासाच्या झंझावातात किती  दुर्लक्ष केले जात आहे, याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील  हजारो किमीच्या रस्त्यांची कामेच सुरू झाली नसल्याच्या  माहितीतून पुढे येत आहे. जिल्हा परिषदेकडे १५00 किमी,  तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३७५ किमीपेक्षाही  अधिक किमी रस्त्यांची निर्मिती होणे बाकी आहे. त्यामध्ये  प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे. अकोला जिल्हा रस्ते विकास योजनेनुसार जिल्ह्यात एकूण  ४७६६ किमीचे रस्ते निर्मिती अपेक्षित आहे. २00१ ते २0२१  या कालावधीतील विकास योजनेनुसार आतापर्यंत त्यापैकी  जवळपास सर्वच रस्त्यांची कामे होणे अपेक्षित असताना  जिल्हा परिषदेकडे असलेल्या तब्बल १४९५ किमीच्या रस् त्यांना अद्याप हातच लागलेला नाही. जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्या रस्त्यांची  जोडणी करण्यासाठी दमबाज पाठपुरावा केल्याचे उदाहरण  नाही. त्यामुळे केवळ अकोला शहराला जोडणारा रस्ता  आहे, म्हणजे झाले, या मानसिकतेत असलेल्या ग्रामस्थांना  एका गावातून दुसर्‍या गावांना जोडणार्‍या रस्त्यांची गरज  आहे, याची अद्याप गरज वाटलेली नाही. त्यामुळेच शासन,  लोकप्रतिनिधी त्यांना माहिती नसल्याचा आनंद उपभोगत  आहेत. जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी ६२४ किमी आहे.  त्यापैकी ३१६ किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने  अस्तित्वात आणले, तर २४४ किमीचे रस्ते जिल्हा परिषदेने  केले. त्यापैकी ६४ किमीच्या रस्त्यांना अद्याप हात लागलेला  नाही. राज्य मार्गांची लांबी ७३४ किमी आहे, त्यापैकी  बांधकाम विभागाने ६६३, तर जिल्हा परिषदेने २0 किमीचे  रस्ते केले. त्यातील ४८ किमी रस्ते निर्मिती झालेली नाही. इ तर जिल्हा मार्गाची लांबी १0९४ किमी आहे, जिल्हा  परिषदेने त्यापैकी ८३0 किमीची निर्मिती केली. २६३ किमी  अद्यापही बाकी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे  असलेल्या या तीनही प्रकारातील रस्त्यांपैकी ३७५ किमी रस् त्याची कामे मिसिंग आहेत. ती करण्यासाठी शासन, लोकप्र ितनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेची  यंत्रणा किती सजग आहे, हे गेल्या काही वर्षातील नवीन  कामांच्या वेगातून दिसून येत आहे.