शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेजर ध्यानचंद बॉक्सिंग चषक अकोला फायटर्सकडे

By admin | Updated: August 31, 2016 02:52 IST

मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वसंत देसाई क्रीडांगणावर बॉक्सिंग स्पर्धा.

अकोला, दि. ३0: राष्ट्रीय क्रीडा दिनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वसंत देसाई क्रीडांगणावर पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत अकोला फायटर्सने प्रभुत्व गाजवून मेजर ध्यानचंद बॉक्सिंग चषक पटकावला. अकोला महानगर बॉक्सिंग संघटना व अकोला क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तेलंगाणा टायगर्सचे खेळाडू सहभागी झाले होते. अकोला आणि तेलंगाणा यांच्यात झालेली चुरशीची लढत पाहण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात आर्क डान्स अकॅदमीच्या चमूने बहारदार नृत्य सादर केले. यावेळी अकोला फायटर्सच्या विजयी १६ खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके व मेजर ध्यानचंद चषक प्रदान करण्यात आला. द्वितीय स्थान मिळविणार्‍या तेलंगाणा टायगर्सच्या १0 खेळाडूंनासुद्धा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ह्यबेस्ट बॉक्सर ऑफ द चॅम्पियनशिपह्णचा खिताब अकोला फायर्टचा राष्ट्रीय विजेता अजय पेंदोरू याला देण्यात आला. तर बेस्ट चॅलेंजर ऑफ दर चॅम्पियनशिपह्णचा खिताब तेलंगाणा टायगर्सचा सी. विजय सिंग याला देण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अकोला फायटर्स व तेलंगाणा टायगर्सच्या प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अमरावती विभागाचे सचिव अक्षय टेंभूर्णीकर, विशाल सुनारिवाल, ऋषिकेश टाकळकर, विक्रमसिंग चंदेल, शे. एजाज शे. इरफान, गुफरान शाह, इरफान रजा, मोनिंदर सिंग, पूजा रहाटे, आरती बुंदेले यांनी काम पाहिले.