शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मेजर ध्यानचंद हेच भारतरत्नचे पहिले दावेदार!

By admin | Updated: January 12, 2015 01:42 IST

फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांचे मत

अकोला: क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न हा मानाचा पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला देण्यात आला. त्याला माझा विरोध नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून या पुरस्कारासाठी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद हेच पहिले दावेदार होते, असे मत फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.रविवारी आयोजित वॉकथॉन स्पर्धेसाठी अकोल्यात आलेले मिल्खा सिंग यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधताना खेळाडूंचे कर्तव्य व जबाबदार्‍या यावर प्रकाश टाकला.

प्रश्न: सचिन तेंडूलकरला मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराबद्दल आपलं मत काय? सचिनला भारतरत्न देण्याबाबत माझी काहीच हरकत नाही; मात्र क्रीडा क्षेत्रातून जर भारतरत्न पुरस्कार द्यायचाच होता तर सर्वप्रथम तो मेजर ध्यानचंद यांना द्यायला हवा होता. मेजर ध्यानचंद यांचे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. सचिनला नंतरही हा पुरस्कार देता आला असता. प्रश्न : या पुरस्काराच्या निकषाबद्दल तुमचे मत काय आहे? भारतरत्न पुरस्कार देताना त्या व्यक्तीने देशाप्रती दिलेले योगदान बघणे गरजेचे आहे. कुणाचे किती योगदान आहे, यावर पुरस्काराचे मापदंड ठरायला हवे. त्या खेळाडूनचा देशाच्या क्रीडा क्षेत्रास किती फायदा झाला, हे बघणे गरजेचे आहे. केवळ खेळाडूची लोकप्रियता बघणे योग्य नाही. प्रश्न : तुम्हाला भारतरत्न द्यायला हवा होता का? मी माझ्यावतीने मला भारतरत्न द्या, अशी मागणी कधीच करणार नाही; मात्र मी त्या पुरस्काराच्या योग्यतेचा आहे, असे शासनाला वाटले तर शासन मला पुरस्कार देईल. हे शासनाने ठरवायला हवे. मी माझ्याकडून कोणतीही मागणी करणार नाही. कोणत्याही खेळाडूने कधीच कोणत्या पुरस्काराची मागणी करू नये. आपण त्या पुरस्काराच्या योग्य असलो तर पुरस्कार मिळतातच. प्रश्न : खेळाडूंच्या आयुष्याविषयी तुम्हाला काय वाटते? खेळाडूंनी खेळत राहायला हवे. पदकाची अपेक्षा असली तरी, तेच मूळ ध्येय असायला नको. खेळण्यामुळे विविध आजार दूर पळतात व आरोग्य चांगले राहते.