शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भाविकांचा मेटॅडोर उलटून एक ठार; १४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:28 IST

बोरगाव मंजू : माहूरवरून परतणार्‍या व्याळा येथील भाविकांच्या मिनी मेटॅडोरला राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूनजीक ८ ऑगस्टच्या रात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये एक ठार, तर १४ जखमी झाले. सदर वाहन चालकाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबोरगावनजीकची घटना जखमीत व्याळय़ाच्या भाविकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : माहूरवरून परतणार्‍या व्याळा येथील भाविकांच्या मिनी मेटॅडोरला राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूनजीक ८ ऑगस्टच्या रात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये एक ठार, तर १४ जखमी झाले. सदर वाहन चालकाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील भाविक रक्षाबंधननिमित्त माहूर येथे यात्रेला गेले होते. १४ भाविक एमएच ३0 एव्ही 0५२0 क्रमांकाच्या मालवाहू मिनी मेटॅडोरने देवदर्शन करून व्याळा येथे परतीच्या मार्गावर होते. बोरगाव मंजूनजीकसदर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने तीन पलट्या खाऊन ते रस्त्याच्या बाजूला खाली पडले. या अपघातामध्ये पुरुषोत्तम श्रीदत्त दांगटे वय ५0 रा. व्याळा हे ठार झाले, तर १४ जण जखमी झाले. जखमीमध्ये ज्योती राऊत (३0), निर्मलाबाई म्हैसने (५५), जिजाबाई इंगळे (५५), आशा नादरे (४५), कमलाबाई नारिंगे (५५), देवका इंगळे (४५), महादेव म्हैसने (५0), अवधूत वानखडे (५0), विनायक इंगळे (५0), राजू इंगळे (२0), दौलत राऊत (४0), जयश्री बराटे (३५), अमोल पाकदुने (१७), गायत्री राऊत (१३) या १४ जणांचा जखमीमध्ये समावेश असून, जखमींना उपचाराकरिता रात्रीच अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी व्याळा येथील निर्मलाबाई म्हैसने, कमलाबाई नारिंगे, जयश्री बराटे, महादेव म्हैसने हे गंभीर जखमी आहेत. सदर घटनेची फिर्याद दौलत राऊत यांनी दिल्यावरून बोरगाव मंजू पोलिसांनी वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याच्या कारणावरून चालकाविरुद्ध भादंविच्या ३३७, ३३८, ३0४, २७९, १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. वाहनासह चालक अजय वाकोडे यास ताब्यात घेतले. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर ठाणेदार पी. के. काटकर, पोलीस कर्मचारी दीपक कानडे, प्रवीण वाकोडे, भागवत कांबळे, श्रीराम इंगळे यांनी मूर्तिजापूर येथील आपत्कालीन अँम्ब्युलन्स बोलावून जखमींना उपचाराकरिता पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर करीत आहेत.