शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात १५ पैकी १० गावांमध्ये महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यापैकी ८ सरपंच व ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यापैकी ८ सरपंच व १० उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली. १० गावांमध्ये महिला सरपंचपदी व गावांमध्ये महिला उपसरपंच पदी विराजमान झाल्या.

तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे महिला सरपंचपद महिलांसाठी राखीव होते. यावेळी निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी झाली. उर्वरित १५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच पदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत कवठा सोपीनाथच्या सरपंचपदी अतुल सुभाषराव बाजड व उपसरपंचपदी शुभांगी प्रशिक मेश्राम यांची निवड झाली. जामठी बु. सरपंचपदी अर्चना संदीप तायडे व उपसरपंचपदी विलास अवधूत गुल्हाने यांची निवड झाली. धामोरी बुद्रूकच्या सरपंच पुष्पा सतीश निलखन, उपसरपंच विजय पांडुरंग चतुरकर, कार्ली सरपंच लताताई ज्ञानेश्वर विटीवाले व उपसरपंच प्रभाताई भगवान वानखडे, राजुरा घाटे सरपंचपदी बंडू रामभाऊ घाटे व उपसरपंचपदी रमेश झिंगाजी इंगळे, खांदला सरपंचपदी सविता राजकुमार पंडित व उपसरपंच माधुरी विलास पिंपळे, धानोरा पाटेकर सरपंच मोनिका अक्षय म्हसाये व उपसरपंच मंगला देवानंद उके, निंभा सरपंच जयश्री प्रदीप फुके व उपसरपंच अनुप प्रभाकर फुके, विराहीत सरपंच ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील व मनोज अरुण राऊत यांची निवड झाली. मोहखेड सरपंचपदी सुवर्णा चंद्रशेखर लांडे व उपसरपंच श्रीधर अनिल कांबे, कंझरा सरपंच अनिता चंद्रकात टोम्पे व उपसरपंच नीलेश शंकरराव गिरी, अनभोरा सरपंच चंद्रकला श्रीराम भगत व उपसरपंच पंचफुला रामदास जाधव व, हातगाव सरपंच अक्षय जितेंद्र राऊत व उपसरपंच वंदना विजय अनभोरे, चिखली सरपंच किशोर देवराव राऊत व उपसरपंच किरण प्रदीप सवाई आणि बपोरीच्या सरपंचपदी मोनिका पंकज खंडारे व उपसरपंचपदी राम बाबुराव खंडारे यांची निवड झाली आहे. निवडणुकांचे अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी रामराव जाधव, विस्तार अधिकारी पंडित राठोड, बंडू पजई, सुरेश तिजारे, मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर, विस्तार अधिकारी विलास चव्हाण, मंडळ अधिकारी महेश नागोलकर, विस्तार अधिकारी मनोज बोपटे, युवराज अंभोरे, विजय किर्तने, मंडळ अधिकारी सुनील डाबेराव, रावसाहेब पाटेकर, सदानंद देशपांडे, राजेंद्र जाधव, मानोहर ननीर यांनी काम पाहिले.

फोटो:

सरपंच व उपसरपंच बिनविरोध

धामोरी बु, कार्ली, निंभा, विराहीत, मोहखेड, कंझरा, अनभोरा, चिखली येथील सरपंच तर धामोरी, कार्ली, राजुरा घाटे, खांदला, निंभा, विराहीत, मोहखेड, कंझरा, अनभोरा, चिखली येथील उपसरपंच अविरोध निवडून आले आहेत.