शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीतील घटक पक्षांच्या पदरी येणार निराशाच!

By admin | Updated: September 17, 2014 00:50 IST

पश्‍चिम विदर्भातील जागा मिळण्याची शक्यता कमीच

अनिल गवई / खामगावपश्‍चिम विदर्भातील काही जागांवर महायुतीतील घटक पक्षांनी दावा ठोकला असला तरी, यापैकी एकही जागा घटक पक्षांसाठी न सोडण्याची भूमिका महायुतीतील प्रमुख पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे जागांच्या अपेक्षेने महायुतीत सहभागी झालेल्या घटक पक्षांचा हिरमोड होणार असल्याचे चित्र दिसत आहे.भाजप-सेना महायुतीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक घटक पक्षाच्या अपेक्षा वेगळ्या असल्या तरी, उद्देश मात्र एकच आहे. काही तरी पदरात पाडून घेण्यासाठीच महायुतीचा डोलारा उभा राहीला आहे. ही वस्तुस्थिती असून प्रत्येक घटक पक्षाने राज्यातील आपल्या प्रभावानुसार जागांची मागणी केली आहे. लोकसभेतील यशाने प्रत्येक घटक पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या असून, त्यांनाही सत्तेत वाटा हवा असल्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या ठिकाणी घटक पक्षाने दावा ठोकला आहे. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा ठोकला आहे. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तसेच बाळापूर मतदारसंघावर रिपाइंच्या आठवले गटाने दावा ठोकला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघासाठी शिवसंग्रामनेही धडपड चालविली आहे; मात्र जागा वाटपावरून भाजप-शिवसेना युतीतच निर्माण झालेली तेढ आणि पश्‍चिम विदर्भातील बहुतांश जागांवर भाजप-सेनेचे असलेले वर्चस्व, या कारणांमुळे घटक पक्षाच्या वाट्याला पश्‍चिम विदर्भात निराशाच येणार असल्याची माहिती समोर येत आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला-बुलडाणा-वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील राखीव मतदारसंघांमध्ये भाजप-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या जागांसाठी खा. आठवलेंनी केलेली मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान खा.आठवले हे बुलडाण्याला आले असता त्यांनी मेहकर मतदार संघ रिपाइंला सोडण्याची मागणी केली. विद्यमान आमदारांच्या विरोधातील जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणत त्यांनी मेहकर मधून रिपाइं ने त्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात रिपाइंला मेहकरची आशा असली तरी जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.