शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

महावितरणचा रोहित्र बदलण्याचा धडाका

By admin | Updated: December 8, 2014 01:08 IST

अमरावती विभागातील ३६0 रोहित्र बदलली.

अकोला : गत एक वर्षापासून रोहित्र जळण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतकरी पाण्याची सोय असल्यावरही सिंचन करू शकत नाहीत. आधीच दुष्काळ, त्यात भारनियमनाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या या मुद्याची राजकीय पुढार्‍यांनी गंभीर दखल घेत महावितरणला त्वरित रोहित्र बदलवून देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महावितरणने त्वरित पावले उचलीत रोहित्र बदलण्याचा धडाका लावला असून, अमरावती विभागातील ३६0 रोहित्रे बदलली आहेत. उर्वरित रोहित्र दोन ते तीन दिवसांत बदलण्यात येणार आहे. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू असल्यामुळे पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे कृषिपंपांचा वापर वाढला आहे. मंजुरीच्या क्षमतेनुसार कृषिपंप सुरू असल्यास रोहित्रे जळण्याची शक्यता फार कमी असते; परंतु मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेची मोटर लावल्यास रोहित्रावर ताण येतो व रोहित्र जळते. जळालेले रोहित्र महिनोमहिने बदलण्यात येत नव्हते. त्यामुळे कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित होत होता. यावर्षी बंद रोहित्रांचा मुद्दा गल्लीपासून तर दिल्लीपर्यंंत गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर आ. हरीश पिंपळे यांच्यापर्यंंत अनेकांनी या मुद्यावर महावितरणला धारेवर धरले. त्यामुळे महावितरणने नादुरुस्त रोहित्रावरील कृषिपंप ग्राहकांनी ७0 टक्के रकमेचा भरणा केला तर रोहित्र प्राधान्याने बदलून देण्याचा निर्णय घेतला. अमरावती परिमंडळातील ७0 टक्के रकमेचा भरणा केलेली ३६0 म्हणजे सर्वच रोहित्रे सद्यस्थितीत बदलण्यात आली आहेत. उर्वरित रोहित्रांवरील काही कृषिपंपधारकांनी ७0 टक्के पेक्षा कमी रकमेचा भरणा केला आहे, अशी २१७ रोहित्रेसुद्धा बदलविण्याचे काम प्रगतीपथावर असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.