शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे धोरण रस्ते विकासासाठी अडसर!

By admin | Updated: September 22, 2015 01:38 IST

सात रस्त्यांची कामे मंजूर, विद्युत पोल हटविणार दुस-याच रस्त्यांचे?

अकोला: महापालिका प्रशासनाने रस्ते विकासाचा निर्णय घेतला असला तरी महावितरणचे धोरण या विकास कामांमध्ये अडसर ठरत आहे. ज्या सात सिमेंट रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय मनपाने घेतला आहे, त्या रस्त्यांवरील विजेचे खांब महावितरणने काढण्याऐवजी दुसर्‍याच रस्त्यांची निवड केल्याने रस्ते विकासाचा खोळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेला प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून शहरात सात प्रमुख सिमेंट रस्त्यांचे निर्माण होणार आहे. सिमेंट रस्त्यांची रुंदी व जाडी वाढवून रस्त्यालगतचे विद्युत पोल हटविण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने यांनी बांधकाम विभागासह महावितरण कंपनीला निर्देश दिले. त्यानुषंगाने महावितरण व मनपा प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे प्रमुख रस्त्यांची पाहणी करीत विद्युत पोल व रोहित्रांचा सर्व्हे केला. या मार्गावरील विद्युत पोल हटविण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे. यादरम्यान, जिल्हा प्रशासनाला शहरातील उर्वरित विकास कामे करण्यासाठी २0 कोटी रुपये प्राप्त झाले. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल ६४ विकास कामे प्रस्तावित केली. २0 कोटी रुपयांतून गोरक्षण रोडचे रुंदीकरण, अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंतच्या रस्त्यालगत पेव्हर बसविण्याचा प्रस्ताव आहे. परंतु संबंधित विकास कामांचे नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यामुळे निश्‍चितच ही कामे लांबणीवर पडली आहेत. मनपामार्फत सिमेंट रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. अशास्थितीत महावितरण कंपनीने सिमेंट रस्त्यांलगतचे विद्युत पोल हटविण्याला प्राधान्य देणे क्रमप्राप्त असताना, याठिकाणी नेमका उलटा प्रकार होत आहे. गोरक्षण रोड व अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंतच्या मार्गावरील विद्युत पोल हटविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी नाशिक येथील कंत्राटदार शहरात दाखल होणार आहेत.