शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

४२ वीज चोरट्यांना महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:08 IST

वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी १२ ऑक्टोंबर २0१७ रोजी  अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक  कारवाई केली.

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई मोहीमेत अभियंत्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी १२ ऑक्टोंबर २0१७ रोजी  अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक  कारवाई केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला  ग्रामीण या तिनही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम  १३५ नूसार (थेट वीजचोरी) ४२ तर कल १२६ नुसार  (वीजेचा गैरवापर) ३ अशा एकून ४५ जणांवर कारवाई  करण्यात आली. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात  महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रादेशिक संचालक  भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या  निर्देशानुसार अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृ त्वाखाली कार्यकारी अभियंते डी.एम.मानकर व प्रमोद काकडे  तसेच उपकार्यकारी अभियंते अधिकारी, कर्मचारी व जनमित्र  असलेल्या पथकाने या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून व विद्युत वाहिन्यावर  आकोडे/हुक टाकून थेट वीजचोरी करणार्‍यामध्ये अकोला  शहर विभागअंतर्गत २६ जणांविरुद्ध, तर अकोट 0२ तर  अकोला ग्रामीण विभागांतर्गत १४ अशा एकूण ४२  ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार  कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस  कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर विजेचा  गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर  करीत असल्याचे 0३ ग्राहक आढळून आले त्यांचेवर भारतीय  विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली.  यापूर्वीसूद्धा अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर  महिन्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक  मोहिमेमध्ये एकूण २९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून  जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची  ठिकाणे निश्‍चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्ध तीने,सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई  करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून  देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी  ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत  वीज जोडणी घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक  अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.