शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:17 IST

अकोला : महावितरण कंपनीच्या खासगी कंत्राटदारास पाच  लाख रुपयांच्या कंत्राटासाठी दहा टक्के रक्कम म्हणजेच ५0  हजार रुपयांची लाच मागणार्‍या महावितरण अकोलाग्रामीण  विभागाच्या कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार याला  अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री  ताब्यात घेतले आहे. दरम्यान उंबरकार याच्या संपत्तीची  चौकशी करण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे.

ठळक मुद्देअकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईपाच लाख रुपयांच्या कंत्राटासाठी ५0 हजार रुपयांची मागितली लाच अकोलाग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकारला घेतले सोमवारी रात्री ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण कंपनीच्या खासगी कंत्राटदारास पाच  लाख रुपयांच्या कंत्राटासाठी दहा टक्के रक्कम म्हणजेच ५0  हजार रुपयांची लाच मागणार्‍या महावितरण अकोलाग्रामीण  विभागाच्या कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार याला  अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री  ताब्यात घेतले आहे. दरम्यान उंबरकार याच्या संपत्तीची  चौकशी करण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे.महावितरण कंपनीमध्ये ४२ वर्षीय खासगी विदूत  कंत्राटदाराने इलेक्ट्रींक कामाचे पाच लाख रुपयांचे कंत्राट घे तले. या कंत्राटाच्या संपूर्ण रकमेच्या दहा टक्के रक्कम  म्हणजेच ५0 हजार रुपये रक्कम कंत्राटाची वर्कऑर्डर  देण्यासाठी ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र सु पडा उंबरकर (३७) याने कंत्राटदारास ८ सप्टेंबर रोजी लाच  मागितली.कंत्राटदाराला ही रक्कम देण्यास मान्य नसल्याने  त्यांनी एसीबीकडे तक्रार  केली. एसीबीचे पोलिस उ पअधीक्षक संजय गोरले यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी  केली. तसेच पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचखोर  देवेंद्र उंबरकार याने लाच मगिल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर देवेंद्र  उंबरकर याला एसीबीने सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.  दरम्यान, एसीबी पथकाकडून त्याच्या घराची झाडाझडती  सुरू आहे. एसीबी त्याला रात्री उशिरा अटक करणार आहेत.  ही कारवाई पोलीस निरीक्षक ईश्‍वर चव्हाण, सुनील राऊत,  सैरिसे व कर्मचार्‍यांनी केली. या प्रकरणामध्ये  आणखी काही  अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत का याचा शोध घेण्यात  आहे. त्या सर्वांची चौकशी करण्यात येत असून उंबरकार ला  मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.